Video | कॅमेऱ्याला पाहून नवरीचा अजब कारनामा, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

तिने कॅमेऱ्याकडे पाहत आपली जीभ बाहेर काढली आहे. तसेच डोळे मिचकावत कॅमेऱ्याकडे पाहत आहे. तसेच पुढे नवरदेवाचा हात आपल्या हातामध्ये पकडून नवरी खळखळून हसत आहे.

Video | कॅमेऱ्याला पाहून नवरीचा अजब कारनामा, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
BRIDE AND GROOM FUN

मुंबई : सोशल मीडियावर लग्न समारंभाचे व्हिडीओ चांगलेच चर्चेत असतात. सध्या तर एक अतिशय मजेदार व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये नवरीने केलेले इशारे पाहून नेटकरी चांगलेच थक्क झाले आहेत. नवरी कॅमेऱ्याकडे पाहून जिभ बाहेर काढत आहे. तसेच आपल्या नवरोबासोबत खळखळून हसत आहे. (bride and groom having fun in front of camera bride blinking eyes video went viral on social media)

डोळे मिचकावत नवरी कॅमेऱ्याकडे पाहत आहे

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. हा व्हिडीओ एका लग्न समारंभातील आहे. नवरी तसेच नवरदेव लग्नविधी पार पाडत आहेत. कॅमेऱामॅन हा सगळा प्रसंग त्याच्या कॅमेऱ्यात कैद करत आहे. लग्नाचा सगळा विधी कॅमेऱ्यात कैद होत असल्याचे दिसताच नवरीला विनोदबुद्धी सूचली आहे. तिने कॅमेऱ्याकडे पाहत आपली जीभ बाहेर काढली आहे. तसेच डोळे मिचकावत कॅमेऱ्याकडे पाहिले आहे. तसेच पुढे नवरदेवाचा हात आपल्या हातामध्ये पकडून नवरी खळखळून हसत आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच आवडला

कशाचीही तमा न बाळगता नवरी आपल्या नवरदेवासोबत लग्नाचा क्षण जगून घेत आहे. नवरीच्या बिनधास्तपणामुळे नेटकरी भारावले आहेत. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला इन्स्टाग्रावर witty_wedding या अकाऊंटवर शेअर शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Video | जेवताना नवरी-नवरदेवाची मस्ती, मजेदार व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा

Video | ऐकावं ते नवलंच ! पाऊस आला म्हणून थेट पहिल्या मजल्यावर चढला, बैलाला खाली आणण्यासाठी तारांबळ

Video | जावयाला समजावण्यासाठी काठीचा वापर, सासऱ्याच्या अजब कारनाम्याचा व्हिडीओ व्हायरल

(bride and groom having fun in front of camera bride blinking eyes video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI