VIDEO : डीजेवाल्या नवरीचा नाद खुळा, भन्नाट गाण्यांवर वऱ्हाडींना नाचवलं

इंटरनेट जगतात दररोज लाखो व्हिडीओ अपलोड होत असतात. त्यापैकी काही व्हिडीओ व्हायरल होतात. हे व्हायरल व्हिडीओ (Wedding Video) अनेकांचे लक्ष वेधून घेत असतात. सध्या लग्नसोहळ्यातील व्हिडीओंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

VIDEO : डीजेवाल्या नवरीचा नाद खुळा, भन्नाट गाण्यांवर वऱ्हाडींना नाचवलं
डीजेवाली नवरी

मुंबई : इंटरनेट जगतात दररोज लाखो व्हिडीओ अपलोड होत असतात. त्यापैकी काही व्हिडीओ व्हायरल होतात. हे व्हायरल व्हिडीओ (Wedding Video) अनेकांचे लक्ष वेधून घेत असतात. सध्या लग्नसोहळ्यातील व्हिडीओंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. लग्नातील गमती-जमतींचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. लग्नातील या व्हिडीओंना मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळतात. सध्या असाच एका लग्नातील व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे.

या व्हिडीओत एक नवरी दिसत आहे. ही नवरी डीजे ( DJ) बनून वऱ्हाडींसाठी गाणी वाजवताना दिसली. नवरीने लावलेल्या गाण्यांवर वऱ्हाडींनी चांगलाच ताल धरला. स्वत: नवरीही नाचत होती. नवरीची ही अदा सर्वांनाच भावली.

हा व्हिडीओ अल्पावधीतच सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेकांनी स्वत:च्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला. एका युजरने व्हिडीओ शेअर करताना म्हटलं, ‘आप दोनों को शादीशुदा जिंदगी की शुभकामनाएं’.

या व्हिडीओवर लाईक्सचाही पाऊस पडत आहे. सर्वजण नवरीचं कौतुक करत आहेत. कोण म्हणालं, नवरी इतक्या बिनधास्त वावरताना पाहून आनंद वाटतो, तर कोणी म्हणालं, “क्रेझी,…. हा क्षण जबरदस्त आहे”. एक जण म्हणाला, स्वत:चं लग्न कशाप्रकारे एन्जॉय करायचं हे या व्हिडीओवरुन दिसतं.

अशाप्रकारे लोकांनी आपआपल्या अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करुन आपआपल्या कमेंट, आपआपली मतं व्यक्त केली आहेत.

खरंतर लग्नाबाबत कोणताही व्हिडीओ (Wedding Video) सोशल मीडियावर पोस्ट केल्यावर, त्यावर लोक भरभरुन प्रतिक्रिया देत असतात. इतकंच नाही तर असे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.

VIDEO :

संबंधित बातम्या  

Viral Video : विश्वास, प्रेम आणि दयाळूपणा, पाहा श्वानाने कशा प्रकारे वाचवले माशांचे प्राण

गाडीच्या छतावर स्वत:ला बांधलं, 180 किमीच्या वेगाने पळवली गाडी, VIDEO पाहून फुटेल घाम!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI