Viral Video : विश्वास, प्रेम आणि दयाळूपणा, पाहा श्वानाने कशा प्रकारे वाचवले माशांचे प्राण

बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की प्रेम, द्वेष यासारखे गुण फक्त माणसांमध्येच असतात. मात्र प्राण्यांमध्ये दयाळूपणा, सेवा यासारखे गुणही असतात, ते एकमेकांना मदत करण्यासाठीही पुढे येतात. याचं एक उदाहरण या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहु शकता. (Viral Video: Faith, love and kindness, see how the dog saved the fish's life)

Viral Video : विश्वास, प्रेम आणि दयाळूपणा, पाहा श्वानाने कशा प्रकारे वाचवले माशांचे प्राण

मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) प्राण्यांची असंख्य फोटो (Animal Pictures and Videos) आणि व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. प्राण्यांशी संबंधित कंटेन्ट हा इंटरनेटवर सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या कंटेन्टपैकी एक आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. प्राण्यांचे काही व्हिडीओ मजेदार आणि गोंडस असतात, तर काही व्हिडीओ तुम्हाला आश्चर्यचकित करतात. सध्या एक कुत्रा माशांना मदत करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हास्य येईल.

बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की प्रेम, द्वेष यासारखे गुण फक्त माणसांमध्येच असतात. मात्र प्राण्यांमध्ये दयाळूपणा, सेवा यासारखे गुणही असतात, ते एकमेकांना मदत करण्यासाठीही पुढे येतात. याचं एक स्पष्ट उदाहरण या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहु शकता, या व्हिडीओत एक कुत्रा माशांना मदत करण्याचा आणि त्यांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करतो आहे. हा व्हिडीओ पाहून कोणालाही स्तब्ध व्हायला होईल, कारण हा कुत्रा कोणत्याही परिस्थितीत माशाला वाचवू इच्छितो आहे आणि त्यासाठी तो सर्वोत्तम प्रयत्न करतोय.

पाहा हा खास व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Animals Dose🐕🐕 (@animals_dose)

या क्यूट व्हिडीओमध्ये असं दिसून येते की, नदीच्या पाण्यामध्ये एक तरुण रस्त्याच्या कडेला बसून मासे पकडतोय, त्याच्यासोबत त्याचा एक कुत्रासुद्धा आहे. ही व्यक्ती एक मासा पकडते आणि त्याच्या शेजारी ठेवलेल्या टबमध्ये ठेवते. दरम्यान, कुत्रा टबजवळ जातो आणि माशांनी भरलेला टब पाण्यात परत फेकतो. हे पाहून, मासे पकडणारी व्यक्ती कुत्र्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, मात्र कुत्र्याला माशांचे प्राण वाचवण्याचं वेड लागलं असत. कुत्रा माणसाला मागे ढकलतो आणि मासे परत पाण्यात फेकतो. या व्हिडीओनं अनेक लोकांची मनं जिंकली आहेत. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर animal_dose या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. लोक हा व्हिडीओ फक्त लाईक किंवा एकमेकांसोबत शेअरच करत नाहीत तर त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया सुद्धा  देत ​​आहेत.

संबंधित बातम्या

Video | कॅमेऱ्याला पाहून नवरीचा अजब कारनामा, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

Video | ऐकावं ते नवलंच ! पाऊस आला म्हणून थेट पहिल्या मजल्यावर चढला, बैलाला खाली आणण्यासाठी तारांबळ

Video | जावयाला समजावण्यासाठी काठीचा वापर, सासऱ्याच्या अजब कारनाम्याचा व्हिडीओ व्हायरल

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI