Video | आली लहर केला कहर, पोहण्याची हौस भागवण्यासाठी घरासमोर उभारला स्विमिंग पूल, जुगाड एकदा पाहाच !

| Updated on: Jul 25, 2021 | 4:40 PM

आपल्या मुलांना पोहण्यासाठी त्याने एक कृत्रिम पूल तयार केला आहे. विशेष म्हणजे हा पूल तयार करण्यासाठी त्याने वापरलेले साहित्य पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

Video | आली लहर केला कहर, पोहण्याची हौस भागवण्यासाठी घरासमोर उभारला स्विमिंग पूल, जुगाड एकदा पाहाच !
swimming pool viral video
Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या या मंचावर एक अतिशय मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका माणसाने जबरदस्त डोकं लावल्याचं दिसतंय. आपल्या मुलांना पोहण्यासाठी त्याने एक कृत्रिम पूल तयार केला आहे. विशेष म्हणजे हा पूल तयार करण्यासाठी त्याने वापरलेले साहित्य पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. (jugaad of swimming pool reaction with help of tractor trolley video went viral on social media)

पोहण्याची हौस पूर्ण व्हावी म्हणून घरासमोरच तयार केला स्विमिंग पूल

या जगात अनेक जुगाडू लोक आहेत. कोण कधी आणि कसं डोकं लावेल हे सांगता येत नाही. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका माणसाने आपल्या मुलाची पोहण्याची हौस पूर्ण व्हावी म्हणून घरासमोरच एक स्विमिंग पूल तयार केला आहे. तयार केलेल्या पुलामध्ये या माणसाचे मुल मजेत पोहत असताना आपल्याला दिसत आहे. यावेळी माणसाने पुलासाठी वापरलेले साहित्यसुद्धा चांगलेच आश्चर्यचकित करणारे आहे.

स्विमिंग पूल तयार करण्यासाठी चक्क ट्रॅक्टरची ट्रॉली वापरली

त्याने स्विमिंग पूल तयार करण्यासाठी चक्क ट्रॅक्टरची ट्रॉली वापरली आहे. ट्रॉलीच्या मदतीने त्याने घरासमोरच स्विमिंग पूल तयार केला आहे. ट्रॉलीमध्ये पॉलिथिन बॅग टाकून त्याने त्यात पाणी भरले आहे. याच पाण्याला स्विमिंग पूल समजून त्याचा मुलगा आनंदात पोहत असल्याचे आपल्याला दिसत आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. घरासमोर स्विमिंग पूल तयार करण्यासाठी माणसाने लढवलेली शक्कल नेटकऱ्यांना चांगलीच भावली आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला सध्या hepgul5 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

वयाच्या 22 व्या वर्षी 11 मुलं, करोडो रुपयांची संपत्ती असलेल्या जोडीला हवे आहेत तब्बल 105 मुलं !

Video | घनदाट जंगलातून वाहनांची ये-जा, मध्येच अस्वलं आलं, पुढे काय झालं ? एकदा पाहाच !

Video | ऑनलाईन क्लास बंद, शाळेत जावे लागणार म्हणून चिमुकलीचे नाटक, मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच

(jugaad of swimming pool reaction with help of tractor trolley video went viral on social media)