मुलांनी केली आईची इच्छा पूर्ण, इंटरनेटवर वाह वाह! व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Oct 20, 2022 | 6:48 PM

एका उंच टेकडीवर ही दोन्ही मुलं आपल्या वृद्ध आईला घेऊन चढले. याचाच व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

मुलांनी केली आईची इच्छा पूर्ण, इंटरनेटवर वाह वाह! व्हिडीओ व्हायरल
Mom son love
Image Credit source: Social Media
Follow us on

एका हृदयस्पर्शी व्हिडिओ समोर आलाय. केरळमधील दोन पुरुषांनी आपल्या वृद्ध आईचं स्वप्न पूर्ण केलंय. आपल्या वृद्ध आईला एक फूल पाहायचं होतं, तिची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या आईला खांद्यावर उचलून घेतले. तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पश्चिम घाटात नीलकुरिंजी नावाचं दुर्मिळ फूल पाहण्यासाठी एका उंच टेकडीवर ही दोन्ही मुलं आपल्या वृद्ध आईला घेऊन चढले. याचाच व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. १२ वर्षांतून एकदाच हे फूल उमलते, असा दावा केला जातोय.

कोट्टायम जिल्ह्यातील मुतुचिरा येथील रहिवासी असलेल्या ८७ वर्षीय एलीकुट्टी पॉल यांनी आपल्या एका मुलाला सांगितले की, इडुक्कीच्या शेजारच्या जिल्ह्यात फुललेली दुर्मिळ फुले पाहायची आहेत.

एलीकुट्टी पॉल वयोमानाशी संबंधित आजारांनी ग्रस्त आहे, ज्यामुळे त्या डोंगर व्यवस्थित चढू शकत नाही, अशी माहिती आहे.

काहीही विचार न करता त्यांची मुले रोजन आणि सत्यन यांनी त्यांना जीपमधून नेले आणि सुमारे १०० कि.मी.चा प्रवास करून मुन्नार जवळील कालीपारा टेकड्यांवर ते पोहोचले.

त्यांना आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. मग त्या दोन मुलांनी आपल्या वृद्ध आईला खांद्यावर उचलून घेतलं आणि टेकडीच्या माथ्यावर सुमारे १.५ कि.मी.वर चढून नीलकुरिंजीच्या फुलांनी नटलेल्या जांभळ्या मैदानाचं आपल्या आईला दर्शन घडवलं.

स्ट्रोबिलंथेस कुंथियाना हे पश्चिम घाटात आढळणारे दुर्मिळ फूल असून ते बारा वर्षांत केवळ एका विशिष्ट प्रदेशात फुलते.

इडुक्की जिल्ह्यातील मुन्नार हिल स्टेशन हे सर्वात प्रसिद्ध नीलकुरिंजी बहरलेले ठिकाण आहे . मुन्नारमध्ये पुढील नीलकुरिंजी बहर आता २०३० मध्येच होईल.