आनंदाची बातमी, ट्रान्स कपलला मुल झालं, पण मुलगा की मुलगी यावर कपल काय म्हणतंय पाहा
पहिल्यांदाच एका पुरूषाने बाळाला जन्म दिला आहे. बाळाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी ही गोड बातमी दिली आहे.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या केरळच्या कोझिकडमधील ट्रान्सजेंडर कपलने गोड बातमी दिली आहे. पहिल्यांदाच एका पुरूषाने बाळाला जन्म दिला आहे. बाळाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी ही गोड बातमी दिली. बुधवारी सकाळी एका सरकारी रूग्णालयामध्ये बाळाला जन्म दिला. सिझेरिअन शस्त्रक्रिया करत सकाळी 9.30 च्या सुमारास ही गर्भधारणा करण्यात आली. मुलाला जन्म देणाऱ्या जहादची प्रकृती उत्तम आहे. मात्र या ट्रान्सजेंडर कपलने आपल्या मुलाच्या लिंगाबद्दल अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. इन्स्टाग्रामवर बाळाचा फोटो शेअर केला आहे. लिंगबदल शस्त्रक्रिया करून झिया महिला आणि जहाद पुरुष बनला होता.
झिया आणि जहाद हे ट्रान्सजेंडर जोडपं आहे. म्हणजे ज्यांनी ऑपरेशन करुन आपलं लिंग परिवर्तन केलं आहे. झिया हा पुरुष म्हणून जन्माला आला होता, तो आता सर्जरी करुन स्त्री झाला आहे. तर स्त्री म्हणून जन्माला आलेली जहाद आता पुरुष झाली आहे. हे ट्रान्सजेंडर जोडपं मागील 3 वर्षापासून एकत्र राहत आहेत
जहाद ही जेव्हा स्त्रीची पुरुष झाला, तेव्हाच तिचे स्तन काढून टाकण्यात आले होते. पण तिच्या शरीरात गर्भपिशवी कायम आहे. तसेच लिंग परिवर्तन करण्यापूर्वी जहादने गर्भधारणा केली होती, त्यामुळे हे शक्य झाल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. दरम्यान, ही बामती सोशस मीडियावर शेअर केल्यावर त्यांना नेटकऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, बाळाचा जन्म सिझरियन शस्त्रक्रियेने होईल की नैसर्गिक असा सवाल अनेकांनी केला होता. सिझरियन शस्त्रक्रियेनेच ही गर्भधारणा करण्यात आली आहे.
