Video | मशीन बंद पडल्यानंतर कामगारांचं भन्नाट जुगाड, नेमकं काय केलं ? एकदा पाहाच !

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये रस्ते तयार करणाऱ्या एका मशिनला सुरु करण्यासाठी चक्क दुचाकीची मदत घेण्यात आली आहे. दुचाकीच्या मदतीने मशिन सुरु करण्यात आली आहे.

Video | मशीन बंद पडल्यानंतर कामगारांचं भन्नाट जुगाड, नेमकं काय केलं ? एकदा पाहाच !
viral video
| Edited By: | Updated on: Sep 10, 2021 | 7:50 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण हरखून जातो. काही व्हिडीओ तर अतिशय मजेदार असतात; ज्यांना पाहून आपल्याला हसू आवरत नाही. सध्या तर एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांनी कामरागांच्या डोकॅलिटीची वाहवा केली आहे.

मजुरांच्या डोकॅलिटीची एकच चर्चा

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये रस्ते तयार करणाऱ्या एका मशीनला सुरु करण्यासाठी चक्क दुचाकीची मदत घेण्यात आली आहे. दुचाकीच्या मदतीने मशीन सुरु करण्यात आली आहे. व्हिडीओमध्ये आपल्याला काही मजूर दिसतील. हे मजूर उभे असून ते रस्तेबांधणीचे काम करत आहेत.

लोखंडी चाक आणि दुचाकीचे चाक यांच्यात घर्षण

रस्त्याची डागडुजी करत असताना कामगारांचे यंत्र बंद पडले आहे. यंत्र बंद पडल्यामुळे ते सुरु करण्यासाठी त्यांनी दुचाकीची मदत घेतल्याचे दिसतेय. दुचाकी सुरु करुन त्यांनी मागचे चाक यंत्राच्या लोखंडी चाकाला लावले आहे. दुचाकीचे रबरी चाक तसेच यंत्रांचे लोखंडी चाक यांचे घर्षण झाल्यामुळे रस्ते बांधण्यासाठी उपयोगात येणारे यंत्र आपोआपच सुरु झाले आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

यंत्र सुरु झाल्यानंतर दुचाकी यंत्रापासून दूर करण्यात आली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो आहे. लोक या जुगाडावर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. तसेच या जुगाडी व्हिडीओला मोठ्या प्रमाणात करत आहेत.

इतर बातम्या :

Video | विमानाच्या पंखाला लटकून तालिबान्यांची मस्ती, नवा व्हायरल व्हिडीओ पाहिलात का ?

Video | लग्न थाटामाटात, पण सासरला जाताना खवळली, नवरीने लगावली नवरदेवाच्या कानशिलात, व्हिडीओ व्हायरल

वाह, नशीब असावे तर असे! ज्या दिवशी दुकान उघडले, त्याच दिवशी 7 कोटींच्या लॉटरीने नशीबही पालटले!