AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lappu Sa Sachin | ‘रसोड़े में कौन था’ वाल्याने बनवलं ‘लप्पू सा सचिन’ गाणं! लोकं म्हणाले, “मजा आगया!”

खरं तर सचिनच्या शेजारणीने कॅमेऱ्यासमोर सांगितलं होतं की, लप्पू सा सचिन, झिंगूर सा बॉय, सचिनमध्ये काय आहे. तेव्हापासून हे प्रकरण व्हायरल झाले आहे. आता याच व्हायरल विषयावर 'रसोडे में कौन था' या शीर्षकावर रॅप बनवणाऱ्या यशराज मुखाते यांनी आपली क्रिएटिव्हिटी दाखवली आहे.

Lappu Sa Sachin | 'रसोड़े में कौन था' वाल्याने बनवलं 'लप्पू सा सचिन' गाणं! लोकं म्हणाले, मजा आगया!
lappu sa sachin viral song
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Aug 06, 2023 | 3:12 PM
Share

मुंबई: पाकिस्तानची सीमा हैदर आणि नोएडाचा सचिन मीना यांची लव्हस्टोरी सध्या ट्रेंडिंग टॉपिक आहे. चहाच्या दुकानापासून गल्लीबोळापर्यंत सीमा हैदरची चर्चा आहे! अनेक मीम्सही बनवण्यात आले आहेत. खरं तर सचिनच्या शेजारणीने कॅमेऱ्यासमोर सांगितलं होतं की, लप्पू सा सचिन, झिंगूर सा बॉय, सचिनमध्ये काय आहे. तेव्हापासून हे प्रकरण व्हायरल झाले आहे. आता याच व्हायरल विषयावर ‘रसोडे में कौन था’ या शीर्षकावर रॅप बनवणाऱ्या यशराज मुखाते यांनी आपली क्रिएटिव्हिटी दाखवली आहे. लप्पू सा सचिनवर त्याने एक गाणं बनवलं आहे, जे लोक मोठ्या उत्सुकतेने पाहत आहेत.

यशराज मुखाते याने सीमाच्या पती सचिनवर करण्यात आलेल्या कमेंटवर एक गाणं तयार केलं आहे. या व्हिडिओमध्ये यशराज गाताना दिसत आहे- बोल वो पाए ना, कोई को भाये ना, समझा आए ना… सचिनमध्ये काय आहे? यानंतर सचिनच्या शेजारणीचा एक व्हायरल व्हिडिओ जोडला गेला आहे ज्यात ती म्हणत आहे- लप्पू सा सचिन है, झिंगूर सा बॉय.. काय आहे सचिनमध्ये? यानंतर त्याने सचिनला आपल्या स्टाईलमध्ये ट्विस्ट दिला आहे. आता ही क्लिप इंटरनेटवर जबरदस्त व्हायरल झालेली आहे. हा व्हिडिओ @yashrajmukhate यशराज मुखाते यांनी 4 ऑगस्ट रोजी पोस्ट केला होता. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले- लप्पू सा सचिन. या क्लिपला 17 लाख व्ह्यूज आणि 1 लाख 80 हजार लाइक्स मिळाले आहेत. तर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या.

सीमा हैदर ही पाकिस्तानची रहिवासी आहे. जुलै २०२३ मध्ये नेपाळमार्गे बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून ती आपल्या चार मुलांसह भारतात आली आणि तिचा भारतीय प्रियकर सचिन मीनाला भेटली. सचिन-सीमा यांची भेट 2023 मध्ये पबजी हा ऑनलाइन गेम खेळताना झाली होती. हळूहळू दोघं बोलले आणि मग प्रेमात पडले. हे प्रेम इतकं घट्ट होतं की सीमा सगळं सोडून भारतात आली. यामुळेच ही लव्हस्टोरी सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Follow Us
CJP आंदोलकांवरील गुन्ह्याबाबत दिल्ली पोलिसांचं मोठं विधान! स्पष्ट केली
Delhi Police | CJP आंदोलकांवरील गुन्ह्याबाबत दिल्ली पोलिसांचं मोठं विधान! स्पष्ट केली भूमिका, म्हणाले आता...
मोठी बातमी! शिक्षण खात्यातील 'त्या'च फाईल गायब? प्रकरण समोर येताच...
मोठी बातमी! शिक्षण खात्यातील 'त्या'च फाईल गायब? प्रकरण समोर येताच...
कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले! कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ
Satara Koyna Dam | कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले! कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ; नदीकाठच्या गावांना अलर्ट जारी
भारताच्या जर्सीमुळे मोठा वाद, भगवा रंग दिसल्याने नवं वादळ, बडा खेळाडू
भारताच्या जर्सीमुळे मोठा वाद, भगवा रंग दिसल्याने नवं वादळ, बडा खेळाडू रागाने लाल!
अनिल परब यांना कोर्टातून मोठा दिलासा! मारहाण प्रकरणात सर्व आरोपांतून..
Anil Parab | अनिल परब यांना कोर्टातून मोठा दिलासा! मारहाण प्रकरणात सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता
स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी... थेट संसदेतच
स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी... थेट संसदेतच बड्या नेत्याने केला खळबळजनक दावा
मनुस्मृतीवरून संसदेत घमासान! खर्गेंच्या वक्तव्याने राज्यसभा दणाणली
Rajyasabha | मनुस्मृतीवरून संसदेत घमासान! खर्गेंच्या वक्तव्याने राज्यसभा दणाणली
केंद्र सरकार मोठ्या तयारीत! दिल्लीत अमित शाहांसह IB प्रमुखांची बैठक,
केंद्र सरकार मोठ्या तयारीत! दिल्लीत अमित शाहांसह IB प्रमुखांची बैठक, CJP च्या इशाऱ्यानंतर मोठा डाव?
कचरा टेंडरवरून पुणे महापालिकेत हायव्होल्टेज ड्रामा; शिवसैनिक थेट गेटवर
Pune | कचरा टेंडरवरून पुणे महापालिकेत हायव्होल्टेज ड्रामा; शिवसैनिक थेट गेटवर चढले!
आधीच सुनावणी झाली असती तर शिंदेंचं सरकार आलंच नसतं; सुप्रीम कोर्टात कप
Shivsena | आधीच सुनावणी झाली असती तर शिंदेंचं सरकार आलंच नसतं; सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद