
प्राण्यांचे अनेक प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जातात. यापैकी काही शिकारीचे व्हिडिओ असतात तर काही गोंडस व्हिडिओ असतात. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. बिबट्यासारख्या वन्यप्राण्याचा हा व्हिडीओ चकित करणारा आहे.
या व्हिडीओमध्ये एक बिबट्या दिसतोय. त्याच्याजवळ एक मोठा आरसा ठेवलेला असतो. पण बिबट्याला आरसा दिसताच तो असा प्रतिक्रिया द्यायला लागतो की तुम्ही सुद्धा पाहून मोठमोठ्याने हसाल.
आरशात स्वत:ची प्रतिमा पाहून बिबट्या आधी घाबरतो आणि मग हल्ला करू लागतो. खरं तर या धोकादायक पण निरागस प्राण्याला असं वाटतं की त्याच्यासमोर स्पर्धा आहे, म्हणजे त्याला आव्हान देण्याचा प्रयत्न करणारा आणखी एक बिबट्या आहे.
हा व्हिडिओ पाहून अनेकांना प्रतिक्रिया देण्यापासून स्वतःला रोखता आलं नाही. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “आरशात स्वत:कडे पाहून बिबट्या अशी प्रतिक्रिया देतो.”
Leopard reacts to seeing himself in a mirror ? pic.twitter.com/Zpsz6dzRMM
— OddIy Terrifying (@OTerrifying) October 22, 2022
15 सेकंदाचा हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे. इतकंच नाही तर हजारो लोकांनी लाईकही केलं आहे. कमेंट सेक्शनमध्ये लोक बिबट्याला गोंडस म्हणताना दिसत होते. काहींनी याला गरीब म्हटले. लोकांना हा व्हिडिओ खूप मजेशीर वाटतो.