Video | माकडांचे रौद्र रुप पाहून चांगलाच घाबरला, बिबट्याने ठोकली धूम, व्हिडीओ एकदा पाहाच !

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक चित्ता आणि दोन माकड दिसत आहेत. बिबट्याने एका प्राण्याची शिकार केल्याचं दिसत आहे. त्याच्या तोंडात काहितरी आहे. कदाचित ते माकडाचे पिल्लू असावे.

Video | माकडांचे रौद्र रुप पाहून चांगलाच घाबरला, बिबट्याने ठोकली धूम, व्हिडीओ एकदा पाहाच !
baboon- leopard viral video
| Edited By: | Updated on: Aug 30, 2021 | 7:49 AM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये प्राण्यांच्या शिकारीचे व्हिडीओ आवडीने पहिले जातात. सध्या आपल्याला आश्चर्यात पाडणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये माकडांनी बिबट्याला थेट पळवून लावलं आहे. (leopard running away from monkeys video went viral on social media)

बिबट्याने प्राण्याची शिकार केली

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक बिबट्या आणि दोन माकड दिसत आहेत. बिबट्याने एका प्राण्याची शिकार केल्याचं दिसत आहे. त्याच्या तोंडात काहितरी आहे. कदाचित ते माकडाचे पिल्लू असावे. आपल्या पिल्लाला पळवल्यामुळे माकडं बिबट्यावर चांगलेच चवताळले आहेत. दोन्ही माकड बिबट्याच्या मागे लागल्याचे व्हिडीओमध्ये दिसतेय.

माकडांना पाहून बिबट्याने थेट पळ काढला

तर दुसरीकडे माकडांना पाहून बिबट्याने थेट पळ काढला आहे. तोंडात शिकार पकडून बिबट्या पळताना दिसत आहे. बिबट्या पळून जात असताना माकडांनीसुद्धा आपला वेग वाढवला आहे. दोन्ही माकड बिबट्याच्या मागे पळत सुटले आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मात्र, वेग जास्त असल्यामुळे बिबट्या माकडांपासून एका क्षणात गायब झाला आहे. माकडांना पाहून बिबट्याने पळ काढल्याचा हा प्रसंग आश्चर्यचकित करणारा असल्यामळे अनेकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. लोक या व्हिडीओला पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही नेटकऱ्यांनी तर या व्हिडीओला आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर शेअरसुद्धा केले आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र त्याला इन्स्टाग्रामवर chekaphotosafaris या अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Video | काचेच्या बॉटलसोबत स्टंटबाजी केली, पुन्हा रडायला लागला, पाहा नेमकं काय घडलं ?

Video | डॅनियलला पाहताच तरुणाला सनी लिओनी आठवली, पाहा पुढे काय झालं ?

Video | भरधाव वेगात आल्याने अपघात, दुचाकी घुसली थेट घरात, मजेदार व्हिडीओ व्हायरल

(leopard running away from monkeys video went viral on social media)