Video | काचेच्या बॉटलसोबत स्टंटबाजी केली, पुन्हा रडायला लागला, पाहा नेमकं काय घडलं ?

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक माणूस बसल्याचे दिसत आहे. त्याच्या हातामध्ये एक काचेची बॉटल आहे. ही बॉटल मोठी आणि टणक असल्याचे दिसतेय.

Video | काचेच्या बॉटलसोबत स्टंटबाजी केली, पुन्हा रडायला लागला, पाहा नेमकं काय घडलं ?
stunt viral video


मुंबई : सोशल मीडियावर रोजच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होतात. या मंचावर जादू, वेगवेगळ्या करामती तसेच विनोदी व्हिडीओ रोज अपलोड केले जातात. मात्र, यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. या व्हिडीओंना पाहून आपण पोट धरून हसायला लागतो. सध्या तर एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. स्टंटबाजी करण्याच्या वेडापाई एक माणसाने स्वत:लाच मारून घेतलं आहे. (man hurt himself while trying to break glass bottle on his head video went viral on social media)

स्टंटबाजी करण्याचा माणसाचा प्रयत्न 

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक माणूस बसल्याचे दिसत आहे. त्याच्या हातामध्ये एक काचेची बॉटल आहे. ही बॉटल मोठी आणि टणक असल्याचे दिसतेय. या बॉटलला घेऊन व्हिडीओतील माणूस स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, या माणसाच्या उचापत्या नंतर त्यालाच भोवल्या आहेत.

माणसाने काचेची बॉटल डोक्यावर आदळली

या मजेदार व्हिडीओमध्ये माणसाने काचेची बॉटल हातात घेतली आहे. या बॉटलला तो त्याच्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न करतोय. हा स्टंट करताना त्याने मोबाईल कॅमेरा सुरु केला आहे. आपण केलेले हे आगळे-वेगळे काम सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरावे असे त्याला वाटत आहे. त्याने काचेची बॉटल आपल्या डोक्यावर आदळली आहे. बॉटल डोक्यावर आदळून ती फोडण्याचा प्रयत्न हा माणूस करतोय.

माणासाला चांगलाच मार बसला

मात्र, हे सारं काही करत असताना या माणसाचाी चांगलीच नाचक्की झाली आहे. काचेची बॉटल टणक असल्यामुळे माणासाला त्याच्या डोक्यावर चांगलाच मार बसला आहे. त्याला चांगलेच लागले आहे. नंतर बॉटल न फुटल्यामुळे हा माणूस रडायला लागला आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला असून नेटकरी त्यावर वगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून त्याला शेअरसुद्धा करत आहेत. हा व्हिडीओ नक्की कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओला वेगवेगळ्या समाजमाध्यमांवर शेअर करण्यात आलं आहे.

इतर बातम्या :

Video | डॅनियलला पाहताच तरुणाला सनी लिओनी आठवली, पाहा पुढे काय झालं ?

Video | भरधाव वेगात आल्याने अपघात, दुचाकी घुसली थेट घरात, मजेदार व्हिडीओ व्हायरल

Video | आधी दिराने मारलं, मग वहिनी भिडली, दोघांची रस्त्यावर जोरदार मारामारी, व्हिडीओ व्हायरल

(man hurt himself while trying to break glass bottle on his head video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI