एकट्या सिंहिणीवर तुटून पडतो तरसांचा कळप, पण नंतर घडतं भलतंच; Wild video viral

Lion & Hyena : व्हायरल (Viral) झालेल्या व्हिडिओमध्ये (Video) काही तरसांनी (Hyena) सिंहिणीवर (Lioness) हल्ला करण्याचे धाडस केले. यानंतर जंगलात एकच गोंधळ उडाला. त्यांनी एकट्या सिंहिणीवर हल्ला केला असेल, पण त्याला जंगलाचे 'नियम' माहीत नव्हते.

एकट्या सिंहिणीवर तुटून पडतो तरसांचा कळप, पण नंतर घडतं भलतंच; Wild video viral
एकट्या सिंहिणीचा पाठलाग करताना तरसांचा कळप
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 03, 2022 | 11:09 AM

Lion & Hyena : सिंह आणि सिंहीण असे प्राणी आहेत, ज्यांच्याशी जंगलातील कोणताही प्राणी लढण्याचे धाडस करत नाही. सिंहिणीला संधी मिळताच ती आपला शिकार फाडून खाते. त्यांचे प्राणघातक पंजे आणि तीक्ष्ण दात कोणालाही क्षणात बळी बनवू शकतात. अशा स्थितीत कोणताही प्राणी सिंहिणीवर हल्ला करण्याचे धाडस करणार नाही. मात्र, सध्या समोर आलेला व्हिडिओ जरा वेगळा आहे. व्हायरल (Viral) झालेल्या व्हिडिओमध्ये (Video) काही तरसांनी (Hyena) सिंहिणीवर (Lioness) हल्ला करण्याचे धाडस केले. यानंतर जंगलात एकच गोंधळ उडाला. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की तरस आणि त्यांच्या पिल्लांचा एक कळप सिंहिणीवर एकत्र तुटून पडतात. व्हिडिओमध्ये पाहून असे दिसते, की ही सर्व तरसांची पिल्ले आहेत. त्यांनी एकट्या सिंहिणीवर हल्ला केला असेल, पण त्याला जंगलाचे ‘नियम’ माहीत नव्हते.

जीव वाचवू लागतो

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की तरसांची पिल्ले सिंहिणीला सळो की पळो करून सोडतात. सिंहीण या तरसांसमोर असहाय्य वाटताना दिसते. यानंतर ती जीव वाचवण्यासाठी धावू लागते. तेव्हाच काहीतरी घडते, ज्याची कल्पनाही या तरसांनी कधीच केली नसेल. ज्या वेळी सिंहिणीवर हल्ला होतो, त्याचवेळी सिंहाचाही एक कळप तिथे येतो. पाहा हा व्हिडिओ…

काही वेळापूर्वी घडले होते भलतेच

सिंहांचा कळप आल्यानंतर वेगळेच घडते. त्यामुळे तरसांच्या पिल्लांना जीव वाचवण्यासाठी पळावे लागते. Animalcoterie नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, की सिंहिणीची शक्ती. व्हिडिओच्या शूटिंगच्या काही वेळापूर्वी सिंहीण आणि तिच्या पिल्लांनी तरसांचा पाठलाग करून त्यांना ठार मारले.

आणखी वाचा :

…अखेर गळाला लागलाच! मासे पकडण्यासाठी काय अफलातून युक्ती केलीय चिमुरड्यानं! हा Jugaad video पाहाच

Grandma & Kili Paul : किली अन् निमा पॉलचं कौतुक आता पुरे झालं, जरा ‘या’ आजींकडेही बघा; Funny video viral

Real Bahubali : कोणाला जमलं नाही ते यानं ‘करून दाखवलं’; लोक म्हणाले, हाच खरा ‘बाहुबली’, Video viral