Grandma & Kili Paul : किली अन् निमा पॉलचं कौतुक आता पुरे झालं, जरा ‘या’ आजींकडेही बघा; Funny video viral

एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पण हा व्हिडिओ खूपच वेगळा आहे. व्हिडिओत किली पॉल, निमा पॉल आणि एक आजी दिसत आहेत. किली पॉल आपल्याशी बोलत आहे, असे समजून त्या आजी त्याच्याशी बोलत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

Grandma & Kili Paul : किली अन् निमा पॉलचं कौतुक आता पुरे झालं, जरा 'या' आजींकडेही बघा; Funny video viral
किली पॉल, निमा पॉल आणि एका आजीचा व्हायरल व्हिडिओ
Image Credit source: Facebook
प्रदीप गरड

|

Apr 02, 2022 | 7:30 AM

Grandma funny video : टांझानियातले लिप-सिंक (Lip sync) करणारे बहीण-भाऊ किली पॉल (Kili Paul) आणि निमा पॉल (Nima Paul) तुम्हाला माहीत असतीलच. भारतीय गाण्यांवरत्यांचे विशेष प्रेम आहे. बॉलिवूडच्या विविध गाण्यांवर ते लिप-सिंक करत असतात. त्यासोबतच अप्रतिम असा डान्सही करतात. ते ज्या वातावरणात राहतात, त्याठिकाणी अशाप्रकारची आवड जोपासणे आणि प्रत्यक्षात आणणे अत्यंत कठीण आहे. तरीही त्यांनी हे सर्व जोपासले आहे. त्यांच्या या कलेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले होते. दोन्ही भाऊ आणि बहिणींचे त्यांच्या अद्भुत सर्जनशीलतेबद्दल मनापासून कौतुक करतो, असे पंतप्रधान म्हणाले होते. आता त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पण हा व्हिडिओ खूपच वेगळा आहे. व्हिडिओत किली पॉल, निमा पॉल आणि एक आजी दिसत आहेत.

मनोरंजनाच्या हेतूने तयार केला व्हिडिओ

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा मनोरंजनाच्या हेतूने तयार केलेला असल्याचे दिसत आहे. एक सोशल मीडिया यूझरने किली पॉलचा एक व्हिडिओ आपल्या मोबाइलवर ऑन केला आहे. त्या यूझरच्या शेजारी एक आजी दिसत आहेत. त्या आजीसमोर किली पॉलचा व्हिडिओ सुरू आहे. हा किली पॉल आपल्याशी बोलत आहे, असे समजून त्या आजी त्याच्याशी बोलत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. हे सर्व अत्यंत मजेशीर असून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय आपण शांत बसत नाहीत.

फेसबुकवर शेअर

फेसबुकवर स्टार मराठी (Stat Marathi) या पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. दीड हजारांहून अधिक लाइक्स या व्हिडिओला मिळाले आहेत. मजेशीर कमेंट्सही यूझर्सनी केल्या आहेत. अनेकांनी इमोजीच्या स्वरुपातच कमेंट्स केल्या आहेत. तर काहींनी म्हटले आहे, की अशा खोट्या पोस्ट करताना नरकात जायची कशी भीती नाही वाटत? यासह मजेशीर कमेंट्स आहेत.

आणखी वाचा :

नशेत धूंद नवरदेव वधूऐवजी सासूलाच घालू लागतो वरमाला, पुढे काय होतं? पाहा Viral video

Russia Ukraine war : युक्रेनच्या मदतीला धावला एक भारतीय मुलगा, निर्वासितांसाठी तयार केलं ‘खास’ App

Video : रानू मंडल से भी तेज, प्लंबर ते हॉलिवूड..! कसं बदललं बाथरूम सिंगरचं नशीब? वाचा सविस्तर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें