AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fitness video : आहे तर चिमुरडा पण कसा उडवतो ‘बार’? तुम्हालाही प्रोत्साहित करेल

little bodybuilder kid : निरोगी आणि फिट (Fit) राहण्यासाठी आजकाल व्यायाम (Exercise) करण्याची क्रेझ वाढलीय. तर तरुणांमध्ये आकर्षक दिसण्यासाठी पिळदार शरीरयष्टी (Body building) कमावण्याकडे भर वाढलाय. एका चिमुरड्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय.

Fitness video : आहे तर चिमुरडा पण कसा उडवतो 'बार'? तुम्हालाही प्रोत्साहित करेल
चिमुरड्याला व्यायामास प्रोत्साहित करताना तरूणImage Credit source: Youtube
| Updated on: Feb 28, 2022 | 7:30 AM
Share

little bodybuilder kid : निरोगी आणि फिट (Fit) राहण्यासाठी आजकाल व्यायाम (Exercise) करण्याची क्रेझ वाढलीय. तर तरुणांमध्ये आकर्षक दिसण्यासाठी पिळदार शरीरयष्टी (Body building) कमावण्याकडे भर वाढलाय. मग कोणी जीममध्ये जातो तर कोणी मोकळ्या मैदानावर… कोरोनाकाळ असल्याने अनेकठिकाणच्या जीम बंद होत्या. आता त्या सुरू झाल्या आहेत. मात्र काही जण आपल्या घरीच डंबेल्स आणि बार आणून व्यायाम करत आहेत. तरूणच नाही, तर लहान मुलंही व्यायाम करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर असे व्यायाम करतानाचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. एक तरूण आणि त्याच्यासोबत एक छोटासा बॉडीबिल्डर दिसत आहे. मेहनत आणि व्यायाम करतानाचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय.

अखेर उचलतोच

व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतंय, की दोघेजण व्यायाम करत आहेत. मोठा मुलगा लहान मुलाला व्यायाम करण्यास प्रोत्साहित करत आहे. त्याच्यासमोर भल्यामोठ्या वजनाचा बार आहे. लहान मुलगा तो उचलू शकत नाही. मात्र मोठा त्याला ते उचलण्यास सांगतो. लहान मुलगा नाही म्हणतो, त्यावेळी तो मागून काठी आणतो आणि त्याला पुन्हा वजन उचलण्यास सांगतो. लहान मुलगाही मग ते उचलण्याचा प्रयत्न करतो आणि त्यात तो यशस्वीही होतो.

यूट्यूबवर अपलोड

यूट्यूबवर विक्रम सिंग फिटनेस (Vikram Singh Fitness) या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय. 27 फेब्रुवारीला अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडिओला तुफान प्रतिसाद मिळत आहे. काही तासांतच या व्हिडिओला 2 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले. त्यात वाढही सातत्यानं होतेय. 16 सेकंदांच्या या व्हिडिओला ‘bhai ne uthaya‘ अशी कॅप्शन देण्यात आलीय. प्रेरणादायी असा हा व्हिडिओ असल्याचे यूझर्स म्हणतायत. (Video courtesy – Vikram Singh Fitness)

आणखी वाचा :

IPS अधिकाऱ्यानं Video share करत म्हटलं जीवन अमूल्य, ही पृथ्वी सर्वांची; यूझर्स म्हणतायत, मग डासांचं काय करायचं?

Viral video : पुराना है यह..! ‘या’ चिमुरडीचे जबरजस्त Stunt आणि Flip पाहून तुम्हीही हेच म्हणाल

वेदनादायी..! क्षेपणास्त्रांमुळे इमारतींची झाली दुरवस्था, विचलित करतील Ukraineमधली ‘ही’ दृश्यं!

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.