AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिलांच्या बूटाचा वास घेण्यासाठी थेट घरात घुसायचा, CCTV पाहून पोलिसही चक्रावले, कारण ऐकून..

महिलांचे बूट चोरून वास घ्यायचा आणि त्याचे व्हिडिओ करून सोशल मीडियावर टाकायचा; मलेशियातील विद्यापीठीन विद्यार्थ्याचा धक्कादायक प्रकार समोर. कारण काय?

महिलांच्या बूटाचा वास घेण्यासाठी थेट घरात घुसायचा, CCTV पाहून पोलिसही चक्रावले, कारण ऐकून..
| Updated on: Aug 07, 2026 | 8:19 PM
Share

मलेशियामध्ये एका विद्यापीठीन विद्यार्थ्याच्या विचित्र आणि धक्कादायक कृत्याचा पर्दाफाश झाला आहे. महिलांच्या घराबाहेर ठेवलेले बूट चोरून त्यांचा वास घेणे आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करणे असा प्रकार हा विद्यार्थी करत असल्याचा आरोप आहे. सीसीटीव्ही फुटेजमुळे हा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्याला अटक केली आहे.

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, ही घटना मलेशियातील शाह आलम परिसरातील आहे. 22 वर्षीय विद्यार्थिनीने पोलिसांकडे तक्रार केली होती की, गेल्या काही महिन्यांपासून एक अज्ञात व्यक्ती तिचा पाठलाग करत असून तिच्यावर लक्ष ठेवत आहे. मात्र त्या व्यक्तीची ओळख पटत नव्हती.

CCTV मधून समोर आलं सत्य

घराच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण प्रकार कैद झाला. फुटेजमध्ये काळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला एक तरुण फ्लॅटबाहेर येतो, ग्रीलमधून हात घालून बाहेर ठेवलेले बूट काढतो आणि त्यांचा वास घेत असल्याचे स्पष्ट दिसून आले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली.

पीडित विद्यार्थिनीच्या म्हणण्यानुसार, एप्रिल महिन्यापासून हा तरुण तिला त्रास देत होता. सीसीटीव्हीमुळे आरोपीची ओळख पटताच तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. शाह आलम पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याच दिवशी रात्री आरोपीला अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीचे वय 20 ते 25 वर्षांच्या दरम्यान असून तोही एका विद्यापीठात शिक्षण घेत आहे. त्याच्यावर यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नव्हता आणि घटनेच्या वेळी तो मद्य किंवा अमली पदार्थांच्या प्रभावाखाली नव्हता.

असं करण्यामागे नेमकं कारण काय?

तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. आरोपी केवळ बुटांचा वास घेत नव्हता तर त्याचे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावरही अपलोड करत होता. त्यामुळे पोलिस आता त्याने अशा प्रकारे आणखी किती महिलांना लक्ष्य केले आणि त्याच्याकडे अशा प्रकारचे इतर व्हिडिओ आहेत का, याचा तपास करत आहेत.

या प्रकरणामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारचे वर्तन मानसिक समस्या, अतिरेकी आकर्षण किंवा विकृत मानसिकतेशी संबंधित असू शकते. त्यामुळे अशा घटनांकडे केवळ विचित्र प्रकार म्हणून न पाहता गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?