Video: लग्न समारंभात गुटखा खाऊन तरुणाचा सुपर डान्स, लोकं फक्त त्यांच्याकडे पाहत राहिले

लग्नात गुटखा खाऊन डान्स करणाऱ्या तरुणाचं सोशल मीडियावर कौतुक, व्हायरल व्हिडीओ तुम्ही पाहिला का ?

Video: लग्न समारंभात गुटखा खाऊन तरुणाचा सुपर डान्स, लोकं फक्त त्यांच्याकडे पाहत राहिले
Viral Dance
Image Credit source: twitter
| Updated on: Jan 03, 2023 | 3:04 PM

मुंबई : लग्नात डान्स (Viral Dance) करुन लोकांचं मनोरंजन करणाऱ्या तरुणांची संख्या अधिक वाढली आहे. सोशल मीडियावर (Social Media) असे रोज व्हिडीओ पाहायला मिळतात. चांगल्या डान्सचे (funny Dance) व्हिडीओ लोकांच्या अधिक पसंतीला पडतात असं अनेकदा सोशल मीडियावर दिसून आलं आहे. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तरुण गुटखा खात डान्स करीत असल्याचं व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडीओ लोकांच्या अधिक पसंतीला पडत असल्यामुळे लोकांनी त्याचं कौतुक देखील केलं आहे.

लग्नात लोकं अनेकदा विचित्र डान्स करीत असताना पाहायला मिळतात. त्यामध्ये नागिन डान्स अधिक प्रसिद्ध आहे. देशभरातील लग्नात डान्स केलेले अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर आहेत. विशेष म्हणजे सध्या व्हायरल झालेला व्हिडीओत तरुण गुटखा खाण्याची नक्कल करीत डान्स करीत आहे.

butterfly__mahi या युझरने हा व्हिडीओ इंन्स्टाग्रामवरती शेअर केला आहे. तो लोकांनी वारंवार पाहिला असल्याचं कमेंटच्या माध्यमातून सांगितलं आहे. काही लोकांनी चांगला डान्स करीत असल्याचं कमेंटच्या माध्यमातून सांगितलं आहे. हा व्हिडीओ पन्नास हजार लोकांनी पाहिला आहे.

आतापर्यंत व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या तुलनेत हा व्हिडीओ कमी कालावधीत अधिक व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर लोकं वारंवार पाहत असल्यामुळे अधिक व्हायरल होण्याची शक्यता आहे.