Viral video : सरावाशिवाय अजिबात करू नका ‘असा’ खतरनाक Stunt!

| Updated on: Feb 20, 2022 | 1:52 PM

Dangerous stunt : स्टंट हा काही लहान मुलांचा खेळ नाही. अनेक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) होतात, ज्यामध्ये लोक विविध प्रकारचे धोकादायक स्टंट करताना दिसतात. असाच एक व्हिडिओ आजकाल खूप व्हायरल होत आहे, जो पाहून आश्चर्य वाटेल.

Viral video : सरावाशिवाय अजिबात करू नका असा खतरनाक Stunt!
धोकादायक स्टंट करताना युवक
Follow us on

Dangerous stunt : स्टंट हा काही लहान मुलांचा खेळ नाही. कोणताही स्टंट करण्यासाठी आधी लोकांना कठोर प्रशिक्षण घ्यावे लागते, मग त्या स्टंटमध्ये परिपूर्णता येते. चित्रपटांमध्ये तुम्हाला अनेकदा नायक किंवा खलनायक वेगवेगळे स्टंट करताना दिसतील. तुम्हाला वाटेल की ते किती सहज स्टंट करतात, मात्र वास्तव काही वेगळेच असते. स्टंट करण्यापूर्वी त्यांना खूप सराव करावा लागतो. अनेकवेळा ते अयशस्वीही होतात, पण त्यांना स्टंट कसा करायचा याची कल्पना येते, त्यानंतर ते आरामात करतात. सध्या तरुणांमध्येही स्टंटबाजीची क्रेझ खूप वाढली आहे. असे अनेक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) होतात, ज्यामध्ये लोक विविध प्रकारचे धोकादायक स्टंट करताना दिसतात. असाच एक व्हिडिओ आजकाल खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

संतुलन आश्चर्यकारक

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की हाफ पँट आणि टोपी घातलेला एक माणूस धोकादायक स्टंट करताना दिसत आहे. त्याचे संतुलन आश्चर्यकारक आहे. दोन्ही पाय जोडून तो अगदी अचूक उडी मारतो आणि लांब अंतरापर्यंत अशा प्रकारे उडी मारत जातो. त्याचा थोडासा तोल गेला असता तर तो लगेच खाली पडला असता, पण त्यासाठी त्याने खूप मेहनत आणि सराव केला असेल, तरच तो हा स्टंट अगदी सहज करत आहे. सराव न करता असे स्टंट करू नयेत, कारण त्यात पडल्यास हातपाय तुटण्याचा धोका असतो.

इन्स्टाग्रामवर शेअर

हा आश्चर्यकारक व्हिडिओ parkour_tribe या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 1 लाख 74 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 18 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइकदेखील केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही यूझर्सनी या व्यक्तीच्या स्टंटचे कौतुक केले आहे, तर काहींनी याला वेडेपणा म्हटले आहे, मात्र हा धोकादायक स्टंट पाहून लोक नक्कीच आश्चर्यचकित झाले आहेत.

आणखी वाचा :

सावधान! सापासोबत असा खेळ जीवावर बेतू शकतो; पाहा, या मुलीसोबत काय घडलं? Snake video viral

Viral : अन्नाची किती ही नासाडी? IAS अधिकाऱ्यानं शेअर केला लग्नसमारंभातला खाद्यपदार्थांचा Photo

‘कोरोनानं लावलं जगाला वेड, त्याची सर्वांना लागण.. या सुरक्षेनं लावला वेळ, झालंबाबा एकदाचं लगन’, यासह ऐका भन्नाट Ukhane