
समजा, एखादी व्यक्ती अचानक गायब झाली आणि पूर्ण 30 वर्षे उलटून गेल्यानंतर एक दिवस अगदी त्याच अवस्थेत परत आली तर जणू तो त्याच दिवशी घरी परतला असावा. वय वाढलेले दिसणार नाही, कपडे बदललेले नसतील, कोणताही बदल नाही! अशीच हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. जिथे एक माणूस तीन दशकांनंतर घरी परतला आणि कुटुंब त्याला पाहून आश्चर्यचकीत झाले. त्यानंतर त्यांची भीती गोंधळात रुपांतरीत झाली आहे. हा प्रकार आता एक रहस्यी ठरत आहे. आचता तो 30 वर्षे कुठे होता असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
कुटुंबाची पहिली प्रतिक्रिया
जेव्हा तो घराच्या दारात येऊन उभा राहिला तेव्हा घरातील लोक त्याला पाहून एक क्षण ओळखूच शकल नाहीत. 30 वर्षांनंतर असे परत येणे हे चमत्कारापेक्षा कमी नव्हते. कुटुंबाच्या मते- त्याचा चेहरा जवळजवळ तसाच दिसत होता. त्याच्या कपड्यांमध्ये कोणताही बदल नव्हता. तो शारीरिकदृष्ट्या देखील गायब होतानाच्या वयाप्रमाणे दिसत होता. कुटुंब भीती आणि आनंद दोन्हीत बुडाले. कारण त्यांना पटत नव्हते की नेमके हे सगळे कसं घडले. कुटुंबाने पोलिसांत अहवाल नोंदवला, शोध घेण्यात आला, पण काहीच मिळाले नाही. काही वर्षांनंतर सर्वांनी मान्य केले की कदाचित त्याचा मृत्यू झाला असेल. घरच्यांनी दरवर्षी त्याची आठवण काढली, पण आशा संपुष्टात आली होती.
कुटुंबाने गुपचूप तक्रार केली
वासिले गोर्गोस, जे आता 95 वर्षांचे आहेत, पूर्वी रोमानियातील एका छोट्या गावात राहणारे एक पशुपालक होते. 1991 मध्ये ते एका छोट्या कामासाठी घरी निघाले होते. त्यांच्याकडे परतण्यासाठीचे ट्रेन तिकीटही होते. पण जेव्हा ते परत आले नाहीत, तेव्हा कुटुंबाने त्यांच्या हरवल्याची तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी खूप शोध घेतला, पण ते सापडले नाहीत. वर्षे उलटत गेली आणि कुटुंबाने मान्य केले की वासिलेचा मृत्यू झाला आहे. त्यांनी त्याच्या स्मृतीसाठी धार्मिक कार्यक्रमही केले.
अज्ञात कारने घरी सोडले
पण मग 29 ऑगस्ट 2021 रोजी अचानक काही तरी विचित्र घडले. वासिले घराबाहेर दिसले. लोकांनी सांगितले की एक कार घरासमोर थांबली, वासिलेला उतरवले आणि लगेच वेगाने निघून गेली. कुणालाच कारचा नंबर दिसला नाही. वासिले गोंधळलेले होते आणि त्यांनी 1991 मध्ये घरी निघतानाचे तेच कपडे घातले होते. त्यांच्या खिशात त्यांचे जुने ओळखपत्र आणि ते परतण्याचे ट्रेन तिकीटही होते, जे कधीच वापरले गेले नव्हते.
डॉक्टरांना त्यांची स्थिती पाहून आश्चर्य वाटले. हलक्या मज्जासंस्थेच्या समस्या वगळता ते त्यांच्या वयानुसार अगदी बरे होते. त्यांना आठवत होते की त्यांचा जन्म 1928 मध्ये झाला, त्यांची पत्नी आता जिवंत नाही आणि ते एका मोठ्या व्यापाऱ्याचे पुत्र होते. पण ते आपल्या मुलाला आणि मुलीला ओळखू शकल नाहीत. त्यांचा संवाद नेहमी त्या दिवसांभोवती फिरत राहत असत, जेव्हा ते पशूंचे संगोपन करत असत. जणू ३० वर्षे उलटलीच नव्हती.
३० वर्षांत काय झाले?
घरच्यांनी आणि शेजाऱ्यांनी त्याला अनेक प्रश्न विचारले. जसे – इतके वर्षे कुठे होता? कदाचित कुणी तरी बंदिस्त ठेवले होते का? वय का वाढलेले दिसत नाही? कपडे इतके वर्ष कसे नवीन दिसत आहेत? पण त्या माणसाने कोणतेही स्पष्ट उत्तर दिले नाही. त्याचे म्हणणे होते की त्याला आठवत नाही की तो कुठे होता, काय झाले, आणि तो आता कसा परत आला.
सर्वांत आश्चर्याची बाब ही होती की तो अगदी त्याच अवस्थेत सापडला. तेच कपडे, ते ओळखपत्र (आयडी), ते जुने ट्रेन तिकीट, ज्यावर त्याच दिवशी प्रवास करायचा होता. त्याला एका कारमधून उतरवले गेले, पण कार इतकी वेगाने निघून गेली की नंबर प्लेटसुद्धा कुणालाच दिसली नाही. त्याच्या परतण्याने अनेक नवीन रहस्यमय प्रश्न निर्माण केले. ३० वर्षांत तो कुठे होता, कसा जगला, काय झाले… कुणालाच काही माहीत नाही. सध्या या प्रकरणी तपास सुरु आहे.