Video | इवल्याशा दुचाकीवर डोंगराएवढं सामान, हेवी ड्रायव्हरची हिम्मत एकदा पाहाच

काही व्हिडीओ आपल्या कायमस्वरुपी लक्षात राहतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ तर अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये सामान घेऊन जाण्यासाठी एका माणसाने जबरदस्त डोकं वापरलं आहे. त्याची डोकॅलिटी पाहून नेटकरी दिवाने झाले आहेत.

Video | इवल्याशा दुचाकीवर डोंगराएवढं सामान, हेवी ड्रायव्हरची हिम्मत एकदा पाहाच
VIRAL VIDEO
| Edited By: | Updated on: Aug 09, 2021 | 9:21 AM

मुंबई : सोशल मीडियावर रोज अनेक प्रकारचे व्हिडीओ शेअर केले जातात. यातील काही व्हिडीओ आपल्या कायमस्वरुपी लक्षात राहतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ तर अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये सामान घेऊन जाण्यासाठी एका माणसाने जबरदस्त डोकं वापरलं आहे. त्याची डोकॅलिटी पाहून नेटकरी दिवाने झाले आहेत. (man riding bike carrying lot of luggage video went viral on social media)

दुचाकीवर मर्यादेपेक्षा जास्त सामान लादले आहे

व्हिडीओमध्ये एक माणूस दुचाकीवर बसून सामान घेऊन जात आहे. त्याने दुचाकीवर मर्यादेपेक्षा जास्त सामान लादले आहे. विशेष म्हणजे एवढे सामान घेऊन हा माणूस अगदी आरामात दुचाकी चालवत आहे. त्याच्या या देशी जुगाडाचा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

हा व्हिडीओ पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. एका नेटकऱ्याने जुगाड लावलं तर काहीही शक्य आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने हा तर चांगलाच हेवी ड्रायव्हर आहे, अशी मजेदार कमेंट केली आहे.

पाहा व्हिडीओ 

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, हा व्हिडीओ पाहून काही लोक या माणसाचे कौतूक करत आहेत. तर काही लोक अशा पद्धतीने दुचाकी चालवणे चुकीचे आहे असे मत व्यक्त करत आहेत. क्षमतेपेक्षा जास्त सामान लादून वाहन चालवल्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारचे स्टंट करु नयेत, असे काही नेटकरी म्हणत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

इतर बातम्या :

Video | मोदींच्या आवाजात नीरज चोप्राला शुभेच्छा, श्याम रंगीलाचा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

VIDEO | अभ्यास सोडून छोटी मुलगी इन्स्टाग्राम रिल्स करण्यात मग्न, आईने शिकवला चांगलाच धडा, व्हिडीओ पाहाच

Video | वरात घेऊन येताच मेहुण्यांनी दिलं ‘हे’ सरप्राईज, नवरदेवही झाला खूश, व्हिडीओ एकदा पाहाच

(man riding bike carrying lot of luggage video went viral on social media)