VIDEO | अभ्यास सोडून छोटी मुलगी इन्स्टाग्राम रिल्स करण्यात मग्न, आईने शिकवला चांगलाच धडा, व्हिडीओ पाहाच

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: अनिश बेंद्रे

Updated on: Aug 08, 2021 | 8:41 AM

सध्या मात्र एका छोट्या मुलीचा व्हिडीओ एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. व्हिडीओ तयार करताना एका छोट्या मुलीला तिच्या आईने चांगलाच धडा शिकवला आहे.

VIDEO | अभ्यास सोडून छोटी मुलगी इन्स्टाग्राम रिल्स करण्यात मग्न, आईने शिकवला चांगलाच धडा, व्हिडीओ पाहाच
small girl funny video

मुंबई : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील लहान मुलांचे व्हिडीओ आवडीने पाहिले जातात. लहान मुलांनी खट्याळपणे केलेल्या खोड्या पाहून मूड फ्रेश होत असल्यामुळे असे व्हिडीओ व्हायरलसुद्धा होतात. सध्या मात्र एका छोट्या मुलीचा व्हिडीओ एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. व्हिडीओ तयार करताना एका छोट्या मुलीला तिच्या आईने चांगलाच धडा शिकवला आहे. (small girl making reels her mother slap video went viral on social media)

व्हिडीओतील मुलगी रिल्स तयार करत आहे 

सध्या डिजिटलायझेशन झाल्यामुळे तरुणांपासून ते वृद्धांपर्यत सगळेजण सोशल मीडियावर सक्रिय असतात. यामध्ये छोटी मुलंसुद्धा मागे नाहीत. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक छोटी मुलगी दिसत आहे. आजकाल शॉर्ट व्हिडीओंचा ट्रेंड असल्यामुळे व्हिडीओतील मुलगी रिल्स तयार करताना दिसत आहे. ती सध्या चर्चेत आलेलं ‘फोन काट दी मम्मी आ गयी क्या’ या हिंदी गाण्यावर वेगवेगळे हावभाव करत आहे. व्हिडीओ तयार करतानाची तिची तन्मयता पाहून अनेकजण हरखून गेले आहेत.

आईने थेट कानशिलात लगावली

मात्र, यावेळी व्हिडीओतील छोट्या मुलीची आई मध्ये आली आहे. अभ्यास सोडून मोबाईलमध्ये वेळ घालवत असल्यामुळे व्हिडीओतील मुलीवर तिची आई चांगलीच चिडली आहे. छोटी मुलगी हावभाव करण्यात मग्न असताना तिच्या आईने तिच्या थेट कानशिलात लगावली आहे. गालावर जोरदार प्रसाद मिळाल्यामुळे मुलगी थेट रडायला लागली आहे.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by RVCJ Media (@rvcjinsta)

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. लोक हा व्हिडीओ पाहून पोट धरुन हसत आहेत. काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या व्हायरल होणारा हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला rvcjinsta या इन्स्टाग्रामच्या पेजवर अपलोड करण्यात आले आहे. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

इतर बातम्या :

Video | हळदी समारंभात धम्माल, महिलांसोबत काकांचा मजेदार डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच

Video | लखनऊ नंतर ‘पानिपत गर्ल’चा कारनामा, कारचालकाला भररस्त्यात मारहाण, व्हिडीओ व्हायरल

Viral Video : पती मोबाईलमध्ये व्यस्त असतानाच पत्नी आली, नंतर काय घडलं ते पाहाच…

(small girl making reels her mother slap video went viral on social media)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI