Viral Video : पती मोबाईलमध्ये व्यस्त असतानाच पत्नी आली, नंतर काय घडलं ते पाहाच…

मोबाईल फोन हीं सध्या प्रत्येकाची गरज बनली आहे. परिस्थिती अशी आहे की मुलं असो किंवा वडील, प्रत्येकजण आपला फोन अशाप्रकारे वापरत असतो की कित्येकदा त्यांना त्यांच्या आजूबाजूच्या जगाची माहितीही नसते. (While the husband was busy with his mobile, the wife came, then see what happened ...)

Viral Video : पती मोबाईलमध्ये व्यस्त असतानाच पत्नी आली, नंतर काय घडलं ते पाहाच...

मुंबई : पती -पत्नीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Videos) होत असतात. काही व्हिडीओ भावनिक असतात, जे पाहून डोळ्यात अश्रू येतात. तर दुसरीकडे, असे काही व्हिडीओ असतात जे आपल्याला खळखळून हसवतात. अशाच प्रकारचा व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू फुटेल. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर, प्रत्येक पत्नीला तिच्या पतीचा मोबाईल (Mobile) फेकून द्यायला आवडेल, कारण ही जवळजवळ प्रत्येक घरातली गोष्ट आहे.

मोबाईल फोन हीं सध्या प्रत्येकाची गरज बनली आहे. परिस्थिती अशी आहे की मुलं असो किंवा वडील, प्रत्येकजण आपला फोन अशाप्रकारे वापरत असतो की कित्येकदा त्यांना त्यांच्या आजूबाजूच्या जगाची माहितीही नसते. सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये असंच काहीसं पाहायला मिळालंय. ज्यात पत्नी अचानक पतीच्या समोर येते, मात्र असं असूनही पती काळजी करत नाही.  हा नवरा त्याच्या मोबाईलमध्ये इतका हरवलेला आहे की त्याची बायको पडल्याचं त्याच्या लक्षातही येत नाही.

काय आहे या व्हिडीओत खास !

या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आपल्या घरात खुर्चीवर कशी बसली आहे हे पाहिले जाऊ शकतं. नवरा त्याच्या फोनमध्ये खूप व्यस्त असतो. मग त्याची बायको समोरून येते आणि बसताना अचानक पडते. धक्कादायक बाब म्हणजे हा पती अजूनही आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त आहे आणि जमिनीवर पडलेल्या पत्नीकडे बघतही नाही. ही घटना घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ बेस्ट व्हिडीओ नावाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. ज्याने हा व्हिडीओ पाहिला तो स्तब्ध झाला. लोक केवळ हा व्हिडीओ शेअर करत नाहीत तर त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स आणि प्रतिक्रिया देखील देत आहेत.

संबंधित बातम्या

Video | ‘खाकी वर्दीची झाकी,’ डोळ्याला चस्मा लावून पोलिसाचा धडाकेबाज डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच !

Viral Video : ‘इंडियाज गॉट टॅलेंट’, प्राण्यांचा असा जुगाड कधी पाहिलात का?

Video | “घराच्या गेटला काळा रंग का दिला ?” लखनऊच्या ‘त्या’ तरुणीचे शेजाऱ्यांसोबत भांडण, नवा व्हिडीओ व्हायरल

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI