Video | ‘खाकी वर्दीची झाकी,’ डोळ्याला चस्मा लावून पोलिसाचा धडाकेबाज डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच !

मुंबई पोलिसामध्ये कार्यरत असलेल्या एका पोलिसाचा मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या पोलिसांने जबरदस्त डान्स केला असून त्याची सोशल मीडियावर एकच चर्चा होत आहे.

Video | 'खाकी वर्दीची झाकी,' डोळ्याला चस्मा लावून पोलिसाचा धडाकेबाज डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच !
viral video

मुंबई : मुंबई पोलीस देशातील सर्वात सक्षम आणि कार्यक्षम पोलीस असल्याचे म्हटले जाते. याच कारणामुळे मुंबई पोलीस कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहतात. सध्या मात्र या पोलिसांची एका वेगळ्याच कारणामुळे चर्चा होत आहे. मुंबई पोलिसामध्ये कार्यरत असलेल्या एका पोलिसाचा मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या पोलिसांने जबरदस्त डान्स केला असून त्याची सोशल मीडियावर एकच चर्चा होत आहे. (Mumbai police Amol Kamble dance on Aya Hai Raja song went viral on social media)

‘आया है राजा…’ या गाण्यावर मजेदार डान्स 

सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे चांगलेच मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना पाहून नेटकऱ्यांना आनंद होतो. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा अतिशय विशेष आहे. या व्डिीओमध्ये अमोल कांबळे नावाचे पोलीस मजेदार डान्स करत आहेत. ते ‘अप्पू राजा’ चित्रपटातील ‘आया है राजा…’ या गाण्यावर थिरकत आहेत. मजेदार डान्सचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी खूश झाले आहेत.

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अमोल कांबळे आणखी एका व्यक्तीसोबत डान्स करत आहेत. अमोल कांबळे यांनी डोळ्यावर काळा चस्मा लावला आहे. तसेच खाकी वर्दीत ते दुसऱ्या एका डान्सरसोबत थिरकत आहेत. त्यांच्या शरीराची हालचाल तसेच चेहऱ्यावरील हावभाव एखाद्या शार्प डान्सरसारखे आहेत. कदाचित याच कारणामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ 

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान हा व्हिडीओ पाहून नेटकरी मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहेत. तसेच मजेदार प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अमोल कांबळे सध्या मुंबई पोलिसात कार्यरत असून ते माहीममध्ये राहतात. लोक या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

इतर बातम्या :

Viral Video : ‘इंडियाज गॉट टॅलेंट’, प्राण्यांचा असा जुगाड कधी पाहिलात का?

Video | “घराच्या गेटला काळा रंग का दिला ?” लखनऊच्या ‘त्या’ तरुणीचे शेजाऱ्यांसोबत भांडण, नवा व्हिडीओ व्हायरल

Video | लाईव्ह रिपोर्टिंदरम्यान पाण्यात बुडाली कार, थरार कॅमेऱ्यात कैद

(Mumbai police Amol Kamble dance on Aya Hai Raja song went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI