Viral Video : ‘इंडियाज गॉट टॅलेंट’, प्राण्यांचा असा जुगाड कधी पाहिलात का?

एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक भुकेलेली शेळी झाडावरून पानं तोडण्यासाठी आश्चर्यकारक युक्त्या वापरताना दिसते. (Viral Goat Video : 'India's Got Talent', Have you ever seen something like this before?)

Viral Video : 'इंडियाज गॉट टॅलेंट', प्राण्यांचा असा जुगाड कधी पाहिलात का?

मुंबई : प्राण्यावर प्रेम करणारे (Animal Lovers) अनेकदा इंटरनेटवर त्यांचे फोटो, व्हिडीओ (Viral Video) बघण्यात वेळ घालवतात. अशा परिस्थितीत कधीकधी मजेदार व्हिडीओ आणि प्राण्यांचे फोटो त्यांना पाहायला मिळत असतात. आपले काम पटकन होण्यासाठी आपण सर्वांनी अनेक वेळा जुगाड किंवा शॉर्टकटचा अवलंब केला असेलच. मात्र तुम्ही कधी प्राण्यांचा जुगाड पाहिला आहे का? होय, प्राण्यांच्या शक्तीला कमी लेखू नका. मनुष्य किंवा प्राणी देखील त्यांचं काम पूर्ण करण्यासाठी खूप मन लावतात. हीच गोष्ट एका शेळीनं केली होती जी जुगाड करून पोट भरत आहे.

त्यांचा एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक भुकेलेली शेळी झाडावरून पानं तोडण्यासाठी आश्चर्यकारक युक्त्या वापरताना दिसते. उंच झाडाचे पानं खाण्यासाठी, शेळीने जबरदस्त जुगाड बनवला आहे. आपली भूक भागवण्यासाठी ही बकरी म्हशीवर चढते आणि मग झाडाची पानं तोडून ती खाण्यास सुरुवात करते. हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा शेळीच्या प्रतिभेचं कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकणार नाही.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. यासोबत त्यांने कॅप्शन लिहिलं, ‘इंडियाज गॉट टॅलेंट’. त्यांनी हा व्हिडीओ शेअर केल्यापासून, या व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडियावर शेळीचा हा व्हिडीओ लोकांच्या पसंतीस उतरतो आहे. लोक केवळ हा व्हिडी शेअर करत नाहीत तर त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण शेळीच्या मेंदूची स्तुती करत आहे. लोक म्हणतात की फक्त माणसांनाच नाही तर प्राण्यांनाही जुगाड कसा करायचा हे माहित आहे.

संबंधित बातम्या

Video | “घराच्या गेटला काळा रंग का दिला ?” लखनऊच्या ‘त्या’ तरुणीचे शेजाऱ्यांसोबत भांडण, नवा व्हिडीओ व्हायरल

VIDEO | ‘एक बार चेहरा हटा दें शराबी’ गाण्यावर नवरा-नवरीचा भन्नाट डान्स, वऱ्हाडी हसून बेजार

Viral Video : फ्लाइट अटेंडंटसोबत गैरवर्तन, प्रवाशाला चक्क विमानातच टेप लावून बांधलं

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI