Video | लखनऊ नंतर ‘पानिपत गर्ल’चा कारनामा, कारचालकाला भररस्त्यात मारहाण, व्हिडीओ व्हायरल

या प्रकारानंतर आता अशीच दुसरी एक घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. हा व्हिडीओ पानीपतचा असून यामध्ये एक महिला कारचालकाला शिवीगाळ करत असून त्याला मारत आहे.

Video | लखनऊ नंतर 'पानिपत गर्ल'चा कारनामा, कारचालकाला भररस्त्यात मारहाण, व्हिडीओ व्हायरल
PANIPAT VIRAL VIDEO

मुंबई : उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे भररस्त्यात एका तरुणीने कॅब ड्रायव्हरला मारहाण केल्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. मारहाणीचा व्हिडीओ पाहून लोक तरुणीवर कडक कारवाई करावी अशी मागणी करत होते. या प्रकारानंतर आता अशीच दुसरी एक घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. हा व्हिडीओ पानिपतचा असून यामध्ये एक महिला कारचालकाला शिवीगाळ करत असून त्याला मारत आहे. (panipat girl biting car driver video went vrial on social media)

पानिपतमध्ये महिलाची कारचालका मारहाण

मागील काही दिवसांपासून लखनऊ येथील तरुणीच्या व्हिडीओमुळे सोशल मीडियावरील वातावरण तापलेलं आहे. या तरुणीवर कडक कारवाई केली जावी अशी मागणी केली जात आहे. त्यानंतर आता पानिपत येथील दुसऱ्या एका महिलेने असाच एक कारनामा केला आहे. ही महिला एका कारचालकाला भर रस्त्यात मारहाण करत आहेत. व्हिडीओमध्ये दिसतं त्याप्रमाणे एका महिलेने आपल्या चेहऱ्याला स्कार्फ बांधलेला आहे. स्कार्फ बांधलेल्या या महिलेने कारचालकाला अडवले आहे. ही महिला कारचालकाशी हुज्जत घालत आहे. तसेच या महिलेने कारचालकाला मारहाणदेखील केली आहे. महिलेच्या या धिंगाण्यामुळे रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. नेटकरी या तरुणीवरदेखील कडक कारवाई केली जावी अशी मागणी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कारचालकाला मारहाण करतानाचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणांवर उपचार करण्यात आला आहे. पीडित युवकांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करुन योग्य ती कारवाईी केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

इतर बातम्या :

Video : नवऱ्याच्या मित्राने दिलेलं गिफ्ट उघडताच नवरी लाजली; नेमकं काय घडलं पाहाच!

Viral Video : पती मोबाईलमध्ये व्यस्त असतानाच पत्नी आली, नंतर काय घडलं ते पाहाच…

Video | ‘खाकी वर्दीची झाकी,’ डोळ्याला चस्मा लावून पोलिसाचा धडाकेबाज डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच !

(panipat girl biting car driver video went vrial on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI