Video | हळदी समारंभात धम्माल, महिलांसोबत काकांचा मजेदार डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच

या व्हिडीओमध्ये हळदी समारंभात एक काका मजेदार डान्स करत आहेत. काकांचा हा डान्स सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Video | हळदी समारंभात धम्माल, महिलांसोबत काकांचा मजेदार डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच
haldi ceremony viral video

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण हरखून जातो. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ तर अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये हळदी समारंभात एक काका मजेदार डान्स करत आहेत. काकांचा हा डान्स सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (man dancing in haldi ceremony video went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये हळदी समारंभ सुरु असल्याचे दिसत आहे. मोठ्या थाटामाटात हा समारंभ पार पाडत आहे. यावेळी महिलांनी पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. तर व्हिडीओमध्ये आकर्षण ठरलेल्या काकांचे कपडेसुद्धा हळदीने भरले आहेत. हळदी समारंभामध्ये हिंदी चित्रपटातील गीत सुरु आहे. या गाण्यावर व्हिडीओतील महिलांनी ठेका धरला आहे.

कॅमेरा दिसताच काकांनी जबरदस्त ठुमके घेतले

या महिलांसोबत काकासुद्धा मजेदार डान्स करत आहेत. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे समोर कॅमेरा दिसताच काकांनी जबरदस्त ठुमके घेतले आहेत. त्यांच्या या ठुमक्यांची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर  व्हायरल

दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला shubham_uke या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Video | ‘खाकी वर्दीची झाकी,’ डोळ्याला चस्मा लावून पोलिसाचा धडाकेबाज डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच !

Viral Video : ‘इंडियाज गॉट टॅलेंट’, प्राण्यांचा असा जुगाड कधी पाहिलात का?

(man dancing in haldi ceremony video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI