Video | मोदींच्या आवाजात नीरज चोप्राला शुभेच्छा, श्याम रंगीलाचा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: prajwal dhage

Updated on: Aug 08, 2021 | 4:48 PM

प्रसिद्ध कॉमेडियन श्याम रंगीलाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाजात मजेदार पद्धतीने नीरजला शुभेच्छा दिल्या आहेत. श्याम रंगिलाने दिलेल्या शुभेच्छांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Video | मोदींच्या आवाजात नीरज चोप्राला शुभेच्छा, श्याम रंगीलाचा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
shyam ranglila

मुंबई : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पुरुष भालाफेकीमध्ये नीरज  चोप्राने सुवर्णपदक पटकावल्यानंतर त्याच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दिग्गज खेळाडूंपासून ते मोठ्या राजकीय व्यक्तींपर्यंत सर्वजण नीरजची वाहवा करत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध कॉमेडियन श्याम रंगीलाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाजात मजेदार पद्धतीने नीरजला शुभेच्छा दिल्या आहेत. श्याम रंगीलाने दिलेल्या शुभेच्छांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (shyam rangila congratulations neeraj chopra with narendra modi video video went viral on social media)

मोदी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

भालाफेकीमध्ये सुवर्णपदक मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरजला फोन करुन प्रत्यक्षपणे खास शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देतानाचा मोदी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये नीरजने केलेली कामगिरी अभिमानास्पद असून संपूर्ण देशाला नीरजवर गौरव असल्याचे मोदी म्हणताना दिसत आहेत.

श्याम रंगीलाने मोदी यांची हुबेहूब नक्कल केली

याच व्हिडीओच्या मदतीने श्याम रंगीलाने मोदी यांची मिमिक्री करत नीरजला खास शुभेच्छा दिल्या आहे. श्याम रंगीलाने मोदी यांची हुबेहूब नक्कल केली आहे. नीरजच्या कामगिरीबद्दल देशाला अभिमान असल्याचे श्याम मोदी यांच्या आवाजात म्हणत आहे. तसेच नीरज तुम्ही देशात जेव्हा परताल तेव्हा संपूर्ण भारत तुमच्या स्वागतासाठी सज्ज असेल असेदेखील श्याम रंगीला म्हणताना आपल्याला दिसतो.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

सोशल मीडियावर श्याम रंगीलाची मिमिक्री आणि कॉमेडी पसंद करणारे लाखो लोक आहेत. त्याच्या प्रत्येक व्हिडीओला हजारो लाईक्स असतात. श्यामने मोदी यांच्या आवाजात नीरजला दिलेल्या शुभेच्छा नेटकऱ्यांना चांगल्याच आवडल्या आहेत. नेटकरी हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात लाईक करत आहेत. तसेच या व्हिडीओवर मजेदार प्रतिक्रिया देत आहेत.

इतर बातम्या :

सोनेरी नीरजचं मोदींबद्दलचं ‘ते’ ट्विट 2 वर्षानंतर लोकांच्या हाती लागलंच, ज्यात तो म्हणाला होता……

VIDEO | अभ्यास सोडून छोटी मुलगी इन्स्टाग्राम रिल्स करण्यात मग्न, आईने शिकवला चांगलाच धडा, व्हिडीओ पाहाच

Video | वरात घेऊन येताच मेहुण्यांनी दिलं ‘हे’ सरप्राईज, नवरदेवही झाला खूश, व्हिडीओ एकदा पाहाच

(shyam rangila congratulations neeraj chopra with narendra modi video video went viral on social media)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI