Video | वरात घेऊन येताच मेहुण्यांनी दिलं ‘हे’ सरप्राईज, नवरदेवही झाला खूश, व्हिडीओ एकदा पाहाच

या व्हिडीओमध्ये वरात घेऊन आलेल्या नवरदेवाचे त्याच्या मेहुण्यांनी खास स्वागत केले आहे. मेहुण्यांनी केलेल्या या जबरदस्त स्वागताचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.

Video | वरात घेऊन येताच मेहुण्यांनी दिलं 'हे' सरप्राईज, नवरदेवही झाला खूश, व्हिडीओ एकदा पाहाच
marriage viral video

मुंबई : सोशल मीडीयावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ तर विशेष आहे. कारण या व्हिडीओमध्ये वरात घेऊन आलेल्या नवरदेवाचे त्याच्या मेहुण्यांनी खास स्वागत केले आहे. मेहुण्यांनी केलेल्या या जबरदस्त स्वागताचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. (groom welcomes by sister in law with dance video went viral on social media)

लग्नमंडपात एंन्ट्री मारताच नवरदेवाचे जंगी स्वागत 

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा एका लग्न समारंभातील आहे. यावेळी व्हिडीओमध्ये नवरदेव नवरीला घेऊन जाण्यासाठी वरात घेऊन आला आहे. उंची कपडे घालून थाटामाटात आलेला हा नवरदेव सर्वांचे आकर्षण ठरतो आहे. लग्नमंडपात एंन्ट्री मारताच नवरदेवाच्या मेहुण्यांनी त्याचे जंगी स्वागत केले आहे. मेहुण्यांनी त्याच्यासमोर धडाकेबाज डान्स केला आहे. यावेळी ‘जिसके आगे जी, जिसके पिछे जी’ या हिंदी गीतावर नवरदेवाच्या मेहुण्या थिरकत आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ :

मेहुण्यांनी दिलेलं हे सरप्राईज पाहून नवरदेव खुश

दरम्यान, मेहुण्यांनी दिलेलं हे सरप्राईज पाहून नवरदेव खुश झाला आहे. व्हिडीओमध्ये नवरदेव हसताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यानंतर काही क्षणांत व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक अनेक प्रतिक्रिया व्यक्त करत असून तो नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, सध्या चर्चेत असणाऱ्या या व्हिडीओला the_bhandari_palace या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Breaking: बजरंग बली की जय!! पैलवान बजरंग पुनियाला कुस्तीत कांस्यपदक, कझाकिस्तानच्या पैलवानावर 8-0 ने मात

Video | हळदी समारंभात धम्माल, महिलांसोबत काकांचा मजेदार डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच

Video | लखनऊ नंतर ‘पानिपत गर्ल’चा कारनामा, कारचालकाला भररस्त्यात मारहाण, व्हिडीओ व्हायरल

(groom welcomes by sister in law with dance video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI