AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनय असावा तर असा! पठ्ठ्या गाडीवर चढून लावतोय जोर, Funny video viral

Funny viral video : एक व्हिडिओ आजकाल सोशल मीडियावर (Social Media) खूप व्हायरल (Viral) होत आहे, एक व्यक्ती गाडीच्या वर चढून तिला ढकलत होता. ती व्यक्ती किती डोकेबाज असेल, हे आता समजू शकेल. एका ठिकाणी ही एक कार अडकली होती.

अभिनय असावा तर असा! पठ्ठ्या गाडीवर चढून लावतोय जोर, Funny video viral
गाडीवर चढून तिला ढकलणारी व्यक्ती
| Updated on: Feb 14, 2022 | 4:51 PM
Share

Funny viral video : तुम्ही कालिदास (Kalidasa) तुम्हाला माहीत असतीलच. ते संस्कृत भाषेचे महान कवी आणि नाटककार होते. पण असे म्हणतात, की सुरुवातीच्या आयुष्यात ते अशिक्षित होते. त्यांची एक मजेदार कथा आजही लोकप्रिय आहे आणि लोक त्याला उदाहरण म्हणून सादर करतात. तुम्ही तीच कथा ऐकली असेल, ज्यात कालिदास ज्या झाडावर बसत होते, त्याच फांद्या तोडत. आता यापेक्षा अविचार काय असू शकतो? असाच एक व्हिडिओ आजकाल सोशल मीडियावर (Social Media) खूप व्हायरल (Viral) होत आहे, पण त्यात झाड किंवा त्याची डहाळी तोडणे असे काही नसून नव्या जमान्यानुसार ती वाहनाशी (Vehicle) संबंधित बाब आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती गाडीच्या वर चढून तिला ढकलत होता. ती व्यक्ती किती डोकेबाज असेल, हे आता समजू शकेल. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की एका ठिकाणी एक कार अडकली आहे आणि काही लोक तिला ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत.

ट्विटर हँडलवर शेअर

यामध्ये एक व्यक्ती असाही आहे जो त्याला खाली जमिनीवर नव्हे तर गाडीवर चढून ढकलतो. तो प्रयत्न करत नाही असे नाही, तो गाडी पुढे ढकलण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. हा मजेदार व्हिडिओ पाहून हसू आल्याशिवाय राहणार नाही. आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘काम करा किंवा करू नका, कामाचा उल्लेख करा आणि काळजी घ्या’. अवघ्या 15 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 5 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे.

‘सर्वात मेहनती माणूस’

सोबतच लोकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर वेगवेगळ्या कमेंट्सही केल्या आहेत. एका यूजरने ‘जोर लगा के हैया…’ अशी मजेशीर कमेंट केली आहे, तर दुसऱ्या यूझरने ‘सर्वात मेहनती माणूस गाडीवर आहे’ असे लिहिले आहे. त्याचप्रमाणे आणखी एका यूझरने विनोदी स्वरात लिहिले आहे, की ही अभिनय करणारी व्यक्ती नक्कीच कोणत्या ना कोणत्या विभागात नियमित कर्मचारी असेल. उर्वरित अनियमित कर्मचारी. फरक स्पष्ट दिसतोय, कुठेही शंका नाही.

आणखी वाचा :

जवानांनी स्वीकारलंय Online गाण्याचं चॅलेंज, पाहा कोण कसं गातंय? Viral Video पाहुन हसू येईल…

महिने किंवा वर्षे नाही, तर काही मिनिटांत उभारा तुमचं घर; कसं? पाहा ‘हा’ Viral Video

#PulwamaAttack : देश विसरणार नाही तुमचं बलिदान! पुलवामात हौतात्म्य पत्करलेल्या जवानांना सोशल मीडियावर श्रद्धांजली

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.