जरांगे पाटील चक्क शाळेच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत! इंग्लिशमध्ये दिली ओळख करून, व्हायरल व्हिडीओवर जरांगे पाटीलसुद्धा हसतील
दोन महिन्यापासून मराठा आरक्षणासाठी लढा देणारा हा लढवय्या कार्यकर्ता आज घराघरांत पोहचलाय. घरातल्या लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत "मनोज जरांगे पाटील" कोण आहेत हे माहिती आहे. मध्ये काही दिवस तर मनोज जरांगे पाटील ट्रेंडिंग सुद्धा होते. ते आता इतके फेमस झालेत की त्यांच्यावर अनेक व्हिडीओ सुद्धा बनलेत.

सागर सुरवसे प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी सोलापूर | 4 नोव्हेंबर 2023 : गेल्या कित्येक दिवसापासून एकच नाव चर्चेत आहे ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. मराठा आरक्षणासाठी झटणारा हा माणूस आरक्षणासाठी याने शेवट्पर्यंत लढा लढला, अजूनही हा लढा सुरूच आहे. उपोषण करत मनोज जरांगे पाटलांनी दाखवून दिलं की कुठलंही आंदोलन शांततेत होऊ शकतं आणि आंदोलन सरकारला झुकवू शकतं. मनोज जरांगे यांचं हे आंदोलन नंतर-नंतर इतकं तीव्र होत गेलं की अनेक ठिकाणी जाळपोळ झाली, नेत्यांच्या मालमत्तेचं नुकसान करण्यात आलं. सरकारकडून काही उपाय काढले जाईना आणि जरांगे पाटील सुद्धा मागे हटेना अशी अवस्था झाली होती. शेवटी मनोज जरांगेंची जिद्द आणि हट्ट बघून सरकारने उपाय काढला आणि त्यांच्याकडे वेळ मागितला. आता जरांगेंनी उपोषण मागे घेतलंय.
छोटा विद्यार्थी मनोज जरांगे पाटील
दोन महिन्यापासून मराठा आरक्षणासाठी लढा देणारा हा लढवय्या कार्यकर्ता आज घराघरांत पोहचलाय. घरातल्या लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत “मनोज जरांगे पाटील” कोण आहेत हे माहिती आहे. मध्ये काही दिवस तर मनोज जरांगे पाटील ट्रेंडिंग सुद्धा होते. ते आता इतके फेमस झालेत की त्यांच्यावर अनेक व्हिडीओ सुद्धा बनलेत.
फॅन्सी ड्रेस स्पर्धेत मनोज जरांगे
सोलापूरच्या एका शाळेत तर फॅन्सी ड्रेस स्पर्धेत एक छोटा विद्यार्थी मनोज जरांगे पाटील यांची वेशभूषा करून आला होता. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय. हे तर काहीच नाही सोलापुरातच एका परीक्षेत उत्तरपत्रिकेत चक्क ‘एक मराठा, कोटी मराठा’ असं लिहिलेलं आढळून आलं. बघा म्हणजे इतके फेमस झालेत आता जरांगे पाटील! एक मुलगा आहे पहिलीतला, एक ते बारावीतला! पहिलीतल्या मुलाने फॅन्सी ड्रेस स्पर्धेत मनोज जरांगे यांना फेमस केलं आणि बारावीतल्याने डायरेक्ट उत्तरपत्रिकेतच लिहिलं. फॅन्सी ड्रेस वाल्याचं नाव स्वराज्य भांगे आणि बारावीतील मुलाचं नाव संकेत लक्ष्मण साखरे.
फेमस झालेत मनोज जरांगे
या बारावीतल्या पठ्ठयाने तर राज्यशास्त्राच्या पेपरलाच हा पराक्रम केलाय. फॅन्सी ड्रेस वाल्याचा व्हिडीओ बघून तर खुद्द जरांगे पाटलांच्याच डोळ्यात अश्रू येतील. म्हणेजच काय तर मनोज जरांगे हे काय उपोषणापुरते मर्यादित राहिलेले नाहीत ते आता पहिली पासून बारावीपर्यंत, लहानांपासून म्हाताऱ्यांपर्यंत फेमस झालेत असं म्हणायला हरकत नाही.