VIDEO : वऱ्हाड निघालं लग्नाला, 161 वऱ्हाडी घेऊन विमान झेपावलं, विमानातच वधू-वर लग्नबेडीत, तामिळनाडूतील अनोखं लग्न

| Updated on: May 23, 2021 | 10:46 PM

तामिळनाडूच्या मदुरै विमानतळावरुन एक खासगी विमान 161 वऱ्हाडी घेऊन अवकाशात झेपावलं आणि हवेतच दोन मोठ्या व्यवसायिकांच्या मुला-मुलीचं मोठ्या जल्लोषात लग्न पार पडलं (Marriage in Flying Plane from Madurai to thoothukudi in Tamilnadu)

VIDEO : वऱ्हाड निघालं लग्नाला, 161 वऱ्हाडी घेऊन विमान झेपावलं, विमानातच वधू-वर लग्नबेडीत, तामिळनाडूतील अनोखं लग्न
वऱ्हाड निघालं लग्नाला, 161 वऱ्हाडी घेऊन विमान झेपावलं, विमानातच वधू-वर लग्नबेडीत, तामिळनाडूतील अनोखं लग्न
Follow us on

चेन्नई : आपल्याला ज्येष्ठ लेखक आणि नाट्य दिग्दर्शक प्रा. लक्ष्मणराव देशपांडे यांचं ‘वऱ्हाड निघालं लंडनला‘ हे एकपात्री नाटक माहिती आहे. या नाटकात लक्ष्मणराव देशपांडे 52 पात्र सादर करतात. नाटकात खेडेगावातल्या शेतकऱ्याच्या मुलाचं विदेशातील मुलीशी लग्न ठरतं. त्यांचं वऱ्हाड विमानप्रवास करुन लंडनला जातं. मग त्यांचा विमानप्रवासातील सगळ्या गंमतीजंमती खूप सुंदरपणे लक्ष्मीकांत यांनी सादर केल्या होत्या. अर्थात या सगळ्या काल्पनिक गोष्टी आहेत. पण आज आम्ही तुम्हाला ज्या लग्नाची गोष्ट सागंणार आहोत ती काल्पनिक नाही. ती खरी पण अनोखी अशीच आहे (Marriage in Flying Plane from Madurai to thoothukudi in Tamilnadu).

तामिळनाडूच्या मदुरै विमानतळावरुन एक खासगी विमान 161 वऱ्हाडी घेऊन अवकाशात झेपावलं आणि हवेतच दोन मोठ्या व्यवसायिकांच्या मुला-मुलीचं मोठ्या जल्लोषात लग्न पार पडलं. या लग्नाचे फोटो आता समोर आले आहेत. हे फोटो आता सोशल मीडियावरही व्हायरल होऊ लागले आहेत (Marriage in Flying Plane from Madurai to thoothukudi in Tamilnadu).

तामिळनाडूत लाकूड व्यवसायिकाच्या मुलाचं अनोखं लग्न

कोरोना संकटामुळे सरकारने लग्नात फक्त 50 जणांना सहभागी होण्याची सूचना दिली आहे. अर्थात तसा तो सध्याचा नियमच आहे. पण प्रत्येकाला आपलं लग्न हे अविस्मरणी असावं, असं वाटतं. अर्थात ते साहजिकच आहे. पण सध्याच्या परिस्थितीत शाही लग्न सोहळा आयोजित करणं खूप कठीण आहे. शिवाय ते अशक्यच आहे. त्यामुळे अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ पार पडत आहेत. पण तामिळनाडूत एका लाकूड व्यवसायिकाच्या मुलाचं अनोख्या पद्धीत शाही विवाह समारंभ पार पडला. हा लग्न समारंभ थेट हवेत विमानात पार पडला. त्यामुळे हे लग्न सध्या चर्चेचं कारण ठरत आहे.

लग्नासाठी खासगी विमान कंपनीकडे विमान बुक

मदुरै येथील गौरीपालयम येथे वास्तव्यास असलेल्या एका लाकूड व्यवसायिकाचा मुलगा राकेश याचा रविवारी (23 मे) एका उद्योगपतीची मुलगी दिक्षणासोबत विवाह झाला. या लग्नाला अविस्मरणीय करण्यासाठी दोन्ही कुटुंबांनी अनोखं शक्कल लढवली. त्यांनी एका खासगी विमान कंपनीकडे एक विमान बुक केलं. हे विमान फक्त दोन्ही कुटुंबांच्या नातेवाईकांसाठी बुक करण्यात आलं होतं. विमानाची क्षमता 161 प्रवाशांची होती. त्यानुसार विमानात तब्बल 161 वऱ्हाडींच्या उपस्थितीत राकेश आणि दिक्षणा लग्नबेडीत अडकले.

विमानातच लग्न आटोपलं

विमान अवकाशात झेपावल्यानंतर राकेशने दिक्षणाच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं. या विमानाने मदुरै येथून उड्डाण घेतलं होतं. विमान हवेत असताना लग्न समारंभ पार पडला. त्यानंतर विमान तत्तुकुडी विमानतळावर लँड झालं. या लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सर्व वऱ्हाडींची आधी कोरोना चाचणी

दरम्यान, लग्नात सहभागी झालेले सर्व 161 वऱ्हाडी यांची विमान प्रवासाआधी कोरोना चाचणी करण्यात आली होती. कोरोना चाचणी केल्यानंतरच त्यांना विमान प्रवासासाठी परवानगी देण्यात आली होती, असं संबंधित खासगी विमान कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

लग्नाचा व्हिडीओ बघा :

हेही वाचा : VIRAL VIDEO | लग्नाच्या वाढदिवशी नवऱ्याकडून एक किलो सोन्याचा हार भेट? व्हायरल व्हिडीओमागील सत्य