AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maut Ka Kuan : स्टंटमॅनसारखं ‘मौत का कुआं’मध्ये धावतायत हे लोक, आयएएस अधिकाऱ्यानं शेअर केला Video

सोशल मीडिया(Social Media)वर 'मौत का कुआं' चॅलेंजचे व्हिडिओ पाहायला मिळाला. आता या व्हिडिओमध्ये कोणताही स्टंटमॅन बाइक किंवा कारनं स्टंट करताना दिसत नाही, तर दोन-तीन लोक पायांनी स्टंट करताना दिसत आहेत.

Maut Ka Kuan : स्टंटमॅनसारखं 'मौत का कुआं'मध्ये धावतायत हे लोक, आयएएस अधिकाऱ्यानं शेअर केला Video
Maut ka Kuan - Challenge
| Edited By: Pradeep Garad | Updated on: Jan 06, 2022 | 1:03 PM
Share

आपण सर्वांनी जत्रेत ‘मौत का कुआं’ (Maut Ka Kuan) पाहिला असेल. मृत्यूच्या या विहिरीत स्टंटमॅन बाइक किंवा कारनं स्टंट करताना आपण पाहतो. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना ‘मौत का कुआं’ पाहायला खूप मजा येते. ती अत्यंत धोकादायक असली तरी.. यात थोडीशी चूक झाल्यास स्टंटमॅन थेट विहिरीत पडून गंभीर जखमी होऊ शकतो. याशिवाय त्यांच्यावर मृत्यूचा धोकाही नेहमीच असतो.

‘मौत का कुआं’सारखं चॅलेंज सोशल मीडिया(Social Media)वर ‘मौत का कुआं’ चॅलेंजचे व्हिडिओ पाहायला मिळाला. आता या व्हिडिओमध्ये कोणताही स्टंटमॅन बाइक किंवा कारनं स्टंट करताना दिसत नाही, तर दोन-तीन लोक पायांनी स्टंट करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हे एक प्रकारचं चॅलेंज आहे, यामध्ये ‘मौत का कुआं’सारखी बनलेली जागा दिसते. यामध्ये खालून धावत वरच्या दिशेनं जावं लागतं आणि वरून खालपर्यंत यावं लागतं.

‘अशाच गतीची गरज’ व्हिडिओमध्ये दिसणारे व्यक्ती हे धोकादायक चॅलेंज पूर्ण करताना दिसतेय. याशिवाय दोन मुलीही हे आव्हान पूर्ण करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. व्हिडिओमध्ये दिसत आहे, की तो व्यक्ती आपल्या दोन मित्रांसह एका ठिकाणी उभा आहे. तो ‘मौत का कुआं’सारख्या आकारात तळापासून वरपर्यंत धावू लागतो. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की ती व्यक्ती अगदी ‘मौत का कुआं’मधल्या एखाद्या स्टंटमॅनसारखी त्यामध्ये धावत आहे. हा व्हिडिओ आयएएस अधिकारी डॉ. एमव्ही राव यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केला. यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, की ‘जीवनात अशाच गतीची गरज आहे.’पाहा हा व्हिडिओ…

थोडा तोल बिघडला तर… ‘मौत का कुआं’मध्ये स्टंट करणं खूप कठीण काम आहे. त्यासाठी वेगासोबतच योग्य संतुलन आवश्यक आहे. अन्यथा छोटीशी चूक स्टंटमॅनची हाडं मोडू शकतो. थोडासाही तोल बिघडला तर खाली पडण्याची शक्यता खूप वाढते.

Viral : रस्त्यावरच्या विक्रेत्यानं मॅगीमध्ये पाण्याऐवजी हे काय मिसळलं? Video पाहून यूझर्स म्हणतायत…

Viral Video : जिराफासोबत पंगा पडला भारी, महिलेला शिकवला चांगलाच धडा

Viral Video : माकडाला पकडायचा होता पाण्याचा बुडबुडा, मग काय झालं? पाहून तुम्हालाही येईल हसू

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान