Viral : रस्त्यावरच्या विक्रेत्यानं मॅगीमध्ये पाण्याऐवजी हे काय मिसळलं? Video पाहून यूझर्स म्हणतायत…

Viral : रस्त्यावरच्या विक्रेत्यानं मॅगीमध्ये पाण्याऐवजी हे काय मिसळलं? Video पाहून यूझर्स म्हणतायत...
कोका कोलामध्ये तयार केलेली मॅगी

मॅगी (Maggi) ही एक अशी डिश आहे, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत खायला आवडते. भाज्यांपासून चिकनपर्यंत आणि कढीपत्त्यापासून गरम मसाला आणि तमालपत्रापर्यंत काहीही टाका, मॅगी तयार होईल. आता कोका-कोला (Coca Cola) मॅगी बाजारात आलीय.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रदीप गरड

Jan 06, 2022 | 12:30 PM

मॅगी (Maggi) ही एक अशी डिश आहे, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत खायला आवडते. तुम्ही आत्तापर्यंत मॅगीचे अनेक प्रकार वापरून पाहिले असतील. कदाचित ही जगातील एकमेव अशी डिश आहे, ज्यावर अनेक विचित्र प्रयोग केले गेले असतील. भाज्यांपासून चिकनपर्यंत आणि कढीपत्त्यापासून गरम मसाला आणि तमालपत्रापर्यंत काहीही टाका, मॅगी तयार होईल. आता कोका-कोला (Coca Cola) मॅगी बाजारात आलीय. मॅगीवरच्या वेगवेगळ्या प्रयोगांबद्दल तुम्ही ऐकलं असेल, पण हा प्रकार फारच विचित्र आहे. चला पाहू या…

विचित्र रेसिपी व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, रस्त्यावरचा एक विक्रेता पॅनमध्ये तेल आणि भाज्या ओततो, त्यानंतर तो मीठ आणि काही मसाले घालून कोका-कोलाची बाटली रिकामी करतो. मग दुकानदारानं नूडल्समध्ये मॅगी मसाला टाकला आणि डिश शिजवण्यासाठी पॅन झाकून ठेवले आणि ही विचित्र डिश तयार झाल्यावर सर्व्ह केली.

गाझियाबादमध्ये मिळते डिश bhukkad_dilli_ke नावाच्या अकाऊंटवरून या विचित्र पदार्थाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलाय. याला 8.5 हजारांहून अधिक लाइक्स मिळालेत. तर 2 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेलाय. पोस्टच्या कॅप्शननुसार, ही डिश गाझियाबादमधल्या सागर पिझ्झा पॉइंटवर मिळते.

‘बिघडवण्यातच जास्त मजा’ हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रियाही नोंदवायला सुरुवात केली. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूझरनं लिहिलंय, की जगाचा अंत जवळ आलाय.’ तर दुसऱ्या यूझरनं लिहिलंय, की अशाप्रकारे मॅगी खाणं माझ्यासाठी खूप अवघड आहे.’ दुसऱ्या यूझरनं व्हिडिओवर कमेंट करत लिहिलंय, ‘काही लोकांना एखादी गोष्ट बिघडवण्यातच मजा येते.

Viral Video : जिराफासोबत पंगा पडला भारी, महिलेला शिकवला चांगलाच धडा

VIDEO : लग्नामध्ये नवरीची धडाकेबाज एन्ट्री, वऱ्हाडी मंडळी आश्चर्याने पहातच राहिले…पाहा व्हायरल व्हिडिओ!

VIDEO : देव तारी त्यास कोण मारी! तीन वाहनांमध्ये भयानक अपघात… मात्र, पुढे असे काही घडले की, पाहुण प्रत्येकजण झाला आश्चर्यचकित

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें