Viral video : मेट्रोमध्ये जागा मिळवण्यासाठी केले असे काही; व्हिडीओ पाहून तुम्हीही पोटधरून हसाल

| Updated on: Feb 18, 2022 | 5:21 PM

मेट्रोमधून प्रवास (Travel by Metro) करणे तशी सर्वसामान्य गोष्ट आहे. मुंबई (Mumbai) , दिल्ली सारख्या शहरांमध्ये अनेक जण आपला वेळ वाचवण्यासाठी मेट्रोनेच प्रवास करतात. सार्वजनिक वाहतुकीची एक उत्तम व्यवस्था म्हणून मेट्रोकडे पाहिले जाते. असाच एक मेट्रो प्रवासाचा व्हिडीओ व्हायरल (Viral video) झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही हसू आवरू शकणार नाहीत.

Viral video : मेट्रोमध्ये जागा मिळवण्यासाठी केले असे काही; व्हिडीओ पाहून तुम्हीही पोटधरून हसाल
Follow us on

Viral video : मेट्रोमधून प्रवास (Travel by Metro) करणे तशी सर्वसामान्य गोष्ट आहे. मुंबई (Mumbai) , दिल्ली सारख्या शहरांमध्ये अनेक जण आपला वेळ वाचवण्यासाठी मेट्रोनेच प्रवास करतात. सार्वजनिक वाहतुकीची एक उत्तम व्यवस्था म्हणून मेट्रोकडे पाहिले जाते. अधिक जलद व स्वस्त वाहतुकीचा पर्याय मेट्रोमुळे नागरिकांना उपलब्ध झाला आहे. मात्र अनेकदा असे होते की, मेट्रोमध्ये गर्दी असल्याने तुम्हाला गाडीमध्ये जागा मिळत नाही. जागा न मिळाल्यामुळे तुम्हाला संपूर्ण प्रवास हा उभ्यानेच करावा लागतो. मात्र अनेक जण जागा मिळवण्यासाठी विविध युक्त्या करत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (social media) चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जागा मिळवण्यासाठी एका व्यक्तीने अशी काही युक्ती केली की, त्याला मेट्रोमध्ये लगेच जागा मिळाली. हा व्हिडीओ पाहून नेटकरी आपले हसू आवरू शकले नाही.

…अन् मेट्रोमध्ये जागा मिळाली

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मेट्रोमध्ये एक व्यक्ती जागा न मिळाल्याने पोलला टेकून उभा आहे. मात्र याचदरम्यान संबंधित व्यक्ती उलटी आल्याचे नाटक करतो. या व्यक्तीला अशा अवस्थेमध्ये पाहून त्याच्या शेजारी बसलेल्या महिला उठून त्याच्यापासून दूर निघून जातात. महिला सीटवरून उठल्याने मेट्रोमध्ये जागा निर्माण होते. त्यानंतर हा व्यक्ती त्या सीटवर जाऊन बसतो आणि आपल्या मोबाईलवर काहीतरी सर्च करतो. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून, या व्हिडीओवर नेटकरी मजेदार कमेंटस करत आहेत.

कोरोनाची दहशत

दरम्यान गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोना महामारिने धुमाकूळ घातला आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने लोक अधिक काळजी घेताना दिसत आहे. सामान्यपणे लोक तोंडाला मास्क लावूनच बाहेर पडतात. सर्दी, खोकला ही कोरोनाची लक्षणे असल्यामुळे कोणी साधे खोकले जरी तरी लोक त्याच्यापासून सुरक्षीत अंतर पाळतात, हेच या व्हिडीओमधून दिसून आले. हा व्हिडीओ hepgul5 नावाच्या इंस्टाग्राम पेज वरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत एकतीस हजारांपेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहे. यातील अनेकांनी तर या व्हिडीओवर मजेदार कमेंटस देखील केल्या आहेत.

प्रवाशाचा व्हायरल व्हिडीओ

संबंधित बातम्या

…अन् असा ‘धप्पा’ दिला, की आईही घाबरली; वाघाचा ‘हा’ Cute video झालाय Viral

#Earthquake : भूकंपानंतर आला महापूर पण Memesचा! ‘हा कधी झाला?’ म्हणत सोशल मीडियावर उडवताहेत खिल्ली

ही वधू नव्हे..! मग आहे तरी कोण? ‘ही’ बातमी सविस्तर वाचा आणि Viral झालेला ‘हा’ Video पाहा…