Video : दोस्ती की सच्ची दास्तान! माकड आणि कुत्र्याची मैत्री, व्हीडिओची सोशल मीडियावर चर्चा…

Video : दोस्ती की सच्ची दास्तान! माकड आणि कुत्र्याची मैत्री, व्हीडिओची सोशल मीडियावर चर्चा...

हा व्हीडीओ Memes.bks यांनी शेअर केला आहे. या व्हीडीओला 'हा सर्वात क्युट व्हीडीओ आहे', असं कॅप्शन देण्यात आलं आहे. या व्हीडिओला आतापर्यंत साडे तीन हजारांहून अधिक लोकांनी पाहिलंय

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

May 22, 2022 | 1:14 PM

मुंबई : सध्या सोशल मीडियावर वेगवेगळे व्हीडिओ शेअर केले जातात. प्राण्यांच्या व्हीडिओंना सध्या खूप पसंती मिळाताना दिसते. काही व्हीडीओ पाहून नेटकरी त्याला फॉरवर्ड करतात अन् असे हे व्हीडिओ सशल मीडियावर चर्चेच येतात. असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हीडीओमध्ये कुत्र्याची आणि माकडाची (Monkey and Dog Video) मैत्री दिसतेय. माकडाला एक चिप्सचं पाकिट घ्यायचं आहे पण ते उंचावर आहे. त्यामुळे ते काढण्यासाठी या माकडाला कुत्रा मदत करतो. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला (Viral Video) आहे.

व्हायरल व्हीडिओ

एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हीडीओमध्ये कुत्र्याची आणि माकडाची मैत्री दिसतेय. माकडाला एक चिप्सचं पाकिट घ्यायचं आहे पण ते उंचावर आहे. त्यामुळे ते काढण्यासाठी या माकडाला कुत्रा मदत करतो. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. कुत्रा आणि माकडाचा हा व्हीडीओ मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये पोस्ट करण्यात आला होता. पण हा व्हीडिओ आत पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दुकानातलं चिप्सचं पाकीट काढण्यासाठी माकडाची धडपड सुरू आहे. ते पाकिट घेण्यासाठी त्याला कुत्र मदत करतो.

हा व्हीडीओ Memes.bks यांनी शेअर केला आहे. या व्हीडीओला ‘हा सर्वात क्युट व्हीडीओ आहे’, असं कॅप्शन देण्यात आलं आहे. या व्हीडिओला आतापर्यंत साडे तीन हजारांहून अधिक लोकांनी पाहिलंय. तर अनेकांनी रिट्विट करत त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

तुफान व्हायरल

एक मजेशीर व्हीडिओ मागच्या काही दिवसांपासून इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय. या व्हीडिओमध्ये दोन माकड दिसत आहेत. या दोन माकडांची मैत्री खूप घट्ट असल्याचं दिसतंय. दोघेही सायकलवरून फेरफटका मारताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हीडिओ पाहून सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा होतेय.व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये दोन माकड एकाच सायकलवर बसलेले दिसत आहेत. एक माकड सायकल चालवत आहे आणि दुसरा मागे बसून आनंद घेत आहे. मागे बसलेल्या माकडाने त्याचं सीट घट्ट पकडलेलं दिसत आहे. त्यांचा हा व्हीडिओ सध्या चर्चेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Funny animal videos (@funny_animal.clips)

हे सुद्धा वाचा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें