AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बघावं ते नवलंच…रस्त्यावर गाडी चालवताना दिसला माकड, व्हिडीओ पाहताच जे केलं ते पाहून…

तुम्ही माकडांना उड्या मारताना आणि मस्ती करताना पाहिले असेल, पण तुम्ही कधी माकडाला गाडी चालवताना पाहिले आहे का? तर आजच्या लेखात आपण अशाच एका व्हायरल झालेल्या व्हिडिओ बद्दल जाणून घेणार आहोत ज्यांची तुफान चर्चा होत आहे.

बघावं ते नवलंच...रस्त्यावर गाडी चालवताना दिसला माकड, व्हिडीओ पाहताच जे केलं ते पाहून...
Monkey car drive
| Edited By: | Updated on: Nov 21, 2025 | 6:54 PM
Share

सोशल मीडियावर कधीकधी अशा गोष्टी व्हायरल होत असतात की ते पाहून लोकं आश्चर्यचकित तर होतातच पण अशा व्हिडिओवर विश्वास ठेवणेही कठीण होते. तर सध्या एक असाच व्हिडिओ व्हायरल होत आहे , ज्यामध्ये एक माकड माणसाप्रमाणे रस्त्यावर गाडी चालवताना दिसतोय पण गाडी नीट बॅलेंस होत नाहीये , त्यामुळे रस्त्यावर गाडी चालवत या माकडाने मात्र कहर केला आहे . त्यातच ही व्हिडिओ पाहून मात्र लोकांना प्रश्न पडला आहे की हा व्हिडिओ खरा आहे की एआयच्या मदतीने तयार केला आहे.

व्हिडिओमध्ये, तुम्ही माकडाला गाडी चालवताना पाहू शकता. सुरुवातीला असे वाटते की तो एक चांगला ड्रायव्हर असेल, परंतु गाडी पुढे जाताच व्हिडिओ पाहणाऱ्यांचा मात्र हा भ्रम तुटतो. कारण माकड प्रथम दोन किंवा तीन दुचाकीस्वारांना धडकतो आणि नंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या इतर वाहनांना धडकतो. त्यानंतरही तो थांबत नाही, उलट गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. असे आश्चर्यकारक दृश्य तुम्ही क्वचितच पाहिले असेल. मात्र या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओबद्दल बोलायचे झाले तर ही घटना खरी नाही; हा व्हिडिओ एआयच्या मदतीने तयार केली गेली आहे, ज्यामुळे ती पूर्णपणे खरोखर असल्याचं अनेकांना वाटत आहे.

माकड गाडी चालवत आहे या कृतीने लोकं झाली आश्चर्यचक्कित

हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) वर @ImJPramod नावाच्या आयडीने शेअर केला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “जेव्हा तुम्ही बाजारात जाता तेव्हा तुमची गाडी लॉक करा. एखाद चोरच ती गाडी चोरेल असे नाही; कधीकधी तुम्हाला अपेक्षा नसलेले प्राणी देखील तुमची गाडी चोरू शकतात.”

हा 15 सेकंदांचा व्हिडिओ 63 हजारा हून अधिक वेळा पाहिला गेला आहे, शेकडो लोकांनी तो लाईक केला आहे आणि विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने विनोदाने म्हटले आहे की, “आज 10-20 लोकांना मारल्यानंतरच हे माकड थांबेल,” तर दुसऱ्याने म्हटले आहे की, “मोनकेश भाई वेडा झाला आहे.” दरम्यान, काही वापरकर्ते म्हणत आहेत की, “हा एक एआय व्हिडीओ आहे, तो काहीही करू शकतो.”

तर आजच्या आधुनिक काळात व टेक्नॉलॉजिच्या युगात असे एआयच्या मदतीने तयार केलेले भन्नाट व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडिओ  पहा

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ