AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video : एमएस धोनी ट्रॅक्टर चालवताना दिसला, या कारणामुळे आनंद महिंद्रा यांनी व्हिडिओ शेअर केला

टीम इंडीयाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. महेंद्रसिंग धोनीने हा व्हिडीओ व्हायरल केल्यानंतर 9 लाख 45 हजार लोकांनी तो व्हिडीओ पाहिला आहे.

Viral Video : एमएस धोनी ट्रॅक्टर चालवताना दिसला, या कारणामुळे आनंद महिंद्रा यांनी व्हिडिओ शेअर केला
Mahendra Singh DhoniImage Credit source: tv9marathi
| Updated on: Feb 11, 2023 | 1:26 PM
Share

मुंबई : भारतीय क्रिकेट टीमचा (Team India) यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) हा नेहमी चर्चेत असतो. पण प्रत्येकवेळी त्याचं कारण सुध्दा वेगळचं असतं. मागच्या काही दिवसांपुर्वी त्याने त्याच्याकडे असलेली जुनी बाईक चालवली त्यानंतर सुद्धा तो अधिक चर्चेत आला होता. त्यानंतर स्ट्रॉबेरीची शेती करतानाचे सुद्धा त्याचे फोटो व्हायरल झाले होते. महेंद्रसिंग धोनीचा एक नवा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. त्यामध्ये महेंद्रसिंग धोनी ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. विशेष म्हणजे महेंद्र धोनीने शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टरचा वापर केला आहे.

या कारणामुळे आनंद महिंद्रा यांनी व्हिडिओ शेअर केला

मागच्या काही दिवसांपासून धोनीचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ महेंद्रसिंग धोनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरती शेअर केला आहे. त्याचबरोबर काही लोकांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर इतर सोशल मीडियावर शेअर केला आहे. आनंद महिंद्रा यांनी सुद्धा हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचबरोबर आनंद महिंद्रा यांना तो व्हिडीओ आवडल्यामुळे शेअर केला आहे.

धोनी ट्रॅक्टर चालवतोय

आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात, त्यांनी तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याचबरोबर त्याला ‘महेंद्र और महिंद्रा (स्वराज)’असं कॅप्शन लिहिलं आहे. व्हायरल झालेल्या त्या व्हिडीओमध्ये महेंद्रसिंग टॅक्टर चालवताना अधिक खूश दिसत आहेत. त्याचबरोबर धोनीने तो व्हिडीओ ज्यावेळी शेअर केला. त्यावेळी कॅप्शनमध्ये “काही नवीन शिकून खूप बरं वाटलं, पण हे काम करण्यासाठी खूप वेळ लागला”

नेटकऱ्यांना सुध्दा व्हिडीओ आवडला

टीम इंडीयाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. महेंद्रसिंग धोनीने हा व्हिडीओ व्हायरल केल्यानंतर 9 लाख 45 हजार लोकांनी तो व्हिडीओ पाहिला आहे. त्याचबरोबर तो व्हिडीओ अजून व्हायरल होत आहे. नेटकरी त्या व्हिडीओवरती अजून कमेंट करीत आहेत. विशेष म्हणजे काही लोकांनी आनंद महिंद्रा यांना जाहिरात करण्यासाठी चांगली शक्कल लढवली असल्याचं म्हटलं आहे.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.