100000 लाख रुपयांचा दंड! सुट्टीवर असणाऱ्या सहकाऱ्याला फोन करायचा नाही, मुंबईतल्या कंपनीचा नियम

त्यांनी त्यांचे कर्मचारी दरवर्षी एक आठवडा कामापासून दूर राहतील आणि सिस्टमशी अनप्लग असतील असं ठरवलं.

100000 लाख रुपयांचा दंड! सुट्टीवर असणाऱ्या सहकाऱ्याला फोन करायचा नाही, मुंबईतल्या कंपनीचा नियम
company rule mumbaiImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 12, 2023 | 3:52 PM

सुट्टीवर जाताना तुम्ही ऑफिसचं काम मागे ठेवता. या सुट्टीच्या काळात ऑफिसमधून तुम्हाला कुणीही त्रास देणार नाही, अशी आशा बाळगता. मात्र, भारतात अजूनही अशी अनेक कार्यालये आहेत, जिथे सुट्टीच्या काळातही त्यांच्यावर कामाचं ओझं असतं. अशा परिस्थितीत मुंबईस्थित एका कंपनीने एक धक्कादायक निर्णय घेतला, ज्यामुळे ऑफिसमधील कर्मचाऱ्याचं मोठं नुकसान होऊ शकतं. एका भारतीय टेक स्टार्टअप कंपनीने सुट्टीच्या काळात सहकाऱ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दंड आकारून या समस्येचं निराकरण करण्याचा निर्णय घेतलाय.

कंपनीने यावर एक उपाय काढला त्यांनी त्यांचे कर्मचारी दरवर्षी एक आठवडा कामापासून दूर राहतील आणि सिस्टमशी अनप्लग असतील असं ठरवलं.

या दरम्यान त्यांना कुणी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर त्यांना एक लाख रुपये दंड भरावा लागेल. ड्रीम11 फँटसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म चालवणारी मुंबईस्थित कंपनी ड्रीम स्पोर्ट्सने एका मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, दरवर्षी आपल्या कर्मचाऱ्यांनी एक आठवड्याची सुट्टी घेणे आवश्यक आहे.

कंपनीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हर्ष जैन यांनी सांगितले की, “जर एखाद्या सहकाऱ्याने सुट्टीच्या काळात त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर त्यांना 1,00,000 रुपये दंड ठोठावण्यात येईल.

“वर्षातून एकदा तुम्हाला आठवडाभरासाठी सिस्टिममधून बाहेर काढलं जाणार. ते पुढे म्हणाले की, यामुळे सुट्टीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका आठवड्याचा चांगला ब्रेक मिळतो. आतापर्यंत हे धोरण ड्रीम स्पोर्ट्सने पाळले असून कालांतराने ते प्रभावी ठरले आहे.

2008 मध्ये सुरू झालेल्या या कंपनीचे सह-संस्थापक आणि सीओओ भावित शेठ म्हणाले, “अनप्लग झालेल्या वेळी कोणालाही कामाचे ओझे नको असते.” एकमेकांच्या सुट्टीचा आदर करणे हे या सगळ्यातून शिकवले जाते.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.