AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई लोकलमध्ये डान्स, व्यावसायिक डान्सरचे ते नृत्य पाहून नेटकरी भडकले

Viral Video: मुंबई लोकलमध्ये डान्स करणारी युवती व्यावसायिक डान्सर आहे. इस्टांग्रामवर तिचे पांच लाखांपेक्षा जास्त फॉलोअर आहेत. तिने केलेल्या या प्रकारामुळे नेटकरी भडकले आहे. रेल्वे पोलीस आणि रेल्वे प्रशासन तिच्यावर कारवाई का करत नाही? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

मुंबई लोकलमध्ये डान्स, व्यावसायिक डान्सरचे ते नृत्य पाहून नेटकरी भडकले
मुंबई लोकलमध्ये डान्स करणारी युवती
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 30, 2024 | 2:12 PM
Share

मुंबई लोकलमधून रोज लाखो मुंबईकर प्रवास करत असतात. गर्दीत प्रवास करत घर ते ऑफिस अन् ऑफिस ते घर गाठत असतात. मुंबई लोकलमध्ये कायदेशीर नियमांची पायमल्ली करत भोजपूर गाण्यावर डान्स झाला. व्यावसायिक डान्सरने केलेला हा डान्स सोशल मीडियावर टाकण्यात आला. त्यानंतर ते अश्लिल नृत्य पाऊन नेटकऱ्यांना संताप व्यक्त केला आहे. ही मुंबईतील संस्कृती नाही, ही परप्रातीयांनी मुंबईच्या संस्कृतीची लावलेली वाट असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. रेल्वेने त्या डान्सवर काही कारवाई केली का नाही? यासंदर्भात काही माहिती मिळू शकली नाही.

सोशल मीडियावर व्हायरल

दिल्लीत मेट्रोमध्ये डान्स आणि प्रेम प्रकरणाची अनेक प्रकरण घडले आहे. त्यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर आले. आता दिल्ली मेट्रोनंतर मुंबईतील लोकलमध्ये डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. डान्स करणारी मुलगी व्यावसायिक डान्सर आहे. तिने वेगवेगळे कपडे परिधान करत आणि स्टेप्स घेत डान्स केला आहे. त्यावेळी लोकलमध्ये अनेक प्रवाशी आहे. तिचे तो डान्स पाहून त्यांना असहज वाटत आहे. अश्लील कपडे परिधान करत डान्स करणाऱ्या त्या मुलीवर कारवाईची मागणी नेटकरी करत आहेत.

सीएसएमटी स्थानकावर डान्सही

मुंबई लोकलमध्ये शूट केलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये मुलीच्या डान्स स्टेप्ससह फिल्मी गाणी मिसळण्यात आली आहेत. मुलीच्या डान्सच्या व्हिडिओवर मुंबईकरांनी प्रश्न उपस्थित केला आहे. आता तुम्ही लोकलमध्ये शांतपणे प्रवास करू शकत नाही, असे काही युजर्सने म्हटले आहे. लोकलमध्ये कधी सामानांची विक्री करणारे विक्रेते येतात तर कधी भिकारी येतात. आता रील निर्माण करणारे येऊ लागले आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये युवती काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ट्रेनमध्ये भोजपुरी गाण्यावर डान्स करताना दिसत. याशिवाय तिने सीएसएमटी स्थानकावर डान्सही केला आहे.

नेटकरी भडकले…

मुंबई लोकलमध्ये डान्स करणारी युवती व्यावसायिक डान्सर आहे. इस्टांग्रामवर तिचे पांच लाखांपेक्षा जास्त फॉलोअर आहेत. तिने केलेल्या या प्रकारामुळे नेटकरी भडकले आहे. रेल्वे पोलीस आणि रेल्वे प्रशासन तिच्यावर कारवाई का करत नाही? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तिला त्वरीत अटक करण्याची मागणी केली जात आहे.

Follow Us
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला....
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर....
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video.
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव....
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार.
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?.
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल.....
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल......
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ..
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ...
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार.
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको.