Video: वाढदिवसाला एक, दोन नाही तर तब्बल 550 केक कापले, मुंबईच्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल!

मुंबईत एका महाशयांनी त्यांच्या वाढदिवशी तब्बल 550 केक एकत्र कापले. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. लोकांनाही हा व्हिडिओ खूप आवडत आहे.

Video: वाढदिवसाला एक, दोन नाही तर तब्बल 550 केक कापले, मुंबईच्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल!
मुंबईत एका महाशयांनी त्यांच्या वाढदिवशी तब्बल 550 केक एकत्र कापले.
| Edited By: | Updated on: Oct 15, 2021 | 5:05 PM

केक कापणं हा वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा एक भाग आहे, वाढदिवसाला केक कापणं हे सामान्य गोष्ट आहे. केकचेही विविध प्रकार आणि आकार असतात. जो तो आपल्या ऐपतीनुसार आणि गरजेनुसार केक कापतो. पण मुंबईत एका महाशयांनी त्यांच्या वाढदिवशी तब्बल 550 केक एकत्र कापले. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. लोकांनाही हा व्हिडिओ खूप आवडत आहे. (Mumbai man cuts 550 cakes on birthday watch viral video)

व्हिडिओमध्ये पाहु शकता की, रस्त्यावर 3 टेबल आहेत. एक व्यक्ती दोन्ही हातांमध्ये चाकू पकडून एकामागून एक केक कापत आहे. या व्यक्तीचे नाव सूर्य रतुरी असे सांगितले जात आहे. हा केक कापत असताना आजूबाजूला उभे असलेले सर्व लोक या क्षणाचा खूप आनंद घेत आहेत.

व्हि़डीओ पाहा:

घटनेच्या वेळी उपस्थित लोकांनी त्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यात व्हिडिओ शूट केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला, त्यानंतर व्हिडिओ व्हायरल होऊ लागला. ही संपूर्ण घटना मंगळवारी घडली. व्हिडिओमध्ये पाहू शकता की, सूर्य रतुरीसह कोणीही मास्क घातलेला नाही किंवा सोशल डिस्टंसिंगचं पालन करत नाही.

जेव्हा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, तेव्हा स्थानिक लोकांनी सूर्य रतुरीच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली. तसे, ही पहिली घटना नाही ज्यात वाढदिवस साजरा करण्याच्या मार्गाने हा भाऊ चर्चेत आहे. तुम्हाला सोशल मीडियावर असे सर्व व्हिडिओ सोशल मीडियावर दिसतील. ज्यात वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धतींमुळे गोंधळ उडाला आहे. यापूर्वीही गुजरातमधील सुरतचा 1 व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात एक व्यक्ती तलवारीने केक कापत होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या व्यक्तीला अटक करण्यात आली. ऑगस्ट महिन्यात सुद्धा एक फोटो खूप व्हायरल झाला, ज्यात 2 मुले तलवारीने केक कापताना दिसत होती. ही घटना पुण्यातील आहे. नंतर, पोलिसांनी दोन्ही तरुणांना तलवारींसह ताब्यात घेतलं.

हेही पाहा :

Video: मांजरीच्या पिलाला रेल्वे ट्रॅकवरुन वाचवलं, लोक म्हणाले, अजून माणुसकी जिवंत आहे!

Video: विमानात लोकल ट्रेनचा माहौल, महिलेच्या गाण्यावर प्रवाशांचा जल्लोष, व्हिडीओ व्हायरल