Video: मांजरीच्या पिलाला रेल्वे ट्रॅकवरुन वाचवलं, लोक म्हणाले, अजून माणुसकी जिवंत आहे!

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये एक माणूस मांजरीचे पिल्लाला रेल्वे ट्रॅकवरून वाचवत असल्याचे दिसत आहे. हे मांजरीचे पिल्लू रेल्वे ट्रॅकवर गेलं होतं, जिथून ट्रेनची सारखी ये जा होत होती. पण या दरम्यान हा व्यक्ती त्या पिलाला पाहतो.

Video: मांजरीच्या पिलाला रेल्वे ट्रॅकवरुन वाचवलं, लोक म्हणाले, अजून माणुसकी जिवंत आहे!
मांजरीला रेल्वे ट्रॅकवरुन वाचवलं

इंटरनेटवर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात काही व्हिडीओ असे असतात जे माणुसकीचं दर्शन घडवतात. आजकालच्या जगात जिथं माणुसकी शोधून सापडावी लागते, तिथं असे व्हिडीओ एक नवीन आशा निर्माण करतात. म्हणूनच नेटकऱ्यांना असे व्हिडीओ चांगलेच आवडतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात तुम्हाला भूतदया आणि माणुसकी या दोन्हींचं दर्शन घडेल. (Man rescues cat from getting crushed under train)

आता हा व्हिडिओ इंटरनेट विश्वात प्रचंड व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये एक माणूस मांजरीचे पिल्लाला रेल्वे ट्रॅकवरून वाचवत असल्याचे दिसत आहे. हे मांजरीचे पिल्लू रेल्वे ट्रॅकवर गेलं होतं, जिथून ट्रेनची सारखी ये जा होत होती. पण या दरम्यान हा व्यक्ती त्या पिलाला पाहतो. ट्रॅकवर मांजरीचे पिल्लू पाहून तो व्यक्ती लगेच रेल्वे ट्रॅकवर उतरतो आणि त्याला वाचवतो. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ कुणीतरी त्याच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला. त्यानंतर ती सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला.

व्हिडीओ पाहा:

हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट होताच लोकांनी त्यावर आपली प्रतिक्रिया नोंदवायला सुरुवात केली. व्हिडिओ पाहिल्यानंतर, एकाने लिहिले की, खऱ्या आयुष्यात हेच लोक हिरो असतात, ज्यांच्यासाठी केवळ माणूसच नाही तर प्राण्यांचे जीवनही तितकंच महत्त्वाचं आहे. दुसर्‍याने लिहलं की, मला वाटते की, आपण सर्वांनी इतकं धाडसी असलं पाहिजे. याशिवाय अनेकांनी इमोजीजमधून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हा व्हिडिओ एक दिवसापूर्वी goodnews_movement नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ 4 लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की लोकांना हा व्हिडिओ किती आवडतो आहे.

हेही पाहा:

Video: अपंग मालकाचं कुत्रं एक पाय झालं, व्हिडीओ पाहा, कळेल, कुत्र्याला माणसाचा निष्ठावान मित्र का म्हणतात!

Video: ट्रेनने रिओचा मुंबई ते भुवनेश्वर प्रवास, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “रिओचा थाटच न्यारा”

Published On - 4:09 pm, Fri, 15 October 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI