
मुंबई | 24 जानेवारी 2024 : लहान मुलं निरागस असतात. त्यांची कल्पनाशक्ती भन्नाट असते. एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोणही अगदीच निरागस आणि तितकाच खरा असतो. असाच व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. एका चिमुकलीचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात या चिमुकलीचा आणि तिच्या वडिलांसोबतचा संवाद आहे. या संवादाने नेटकऱ्यांना भूरळ घातली आहे. हा व्हीडिओ 10 मिलियन पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. नेटकऱ्यांना या व्हीडिओला भरभरून पसंती दिली आहे.
ओवी नायक या चिमुकलीचा हा व्हीडिओ आहे. यात ओवी झोपावी यासाठी तिचे वडील अंगाई गात आहेत. तू डोळे झाक मी गाणं म्हणतो, असं तिचे वडील म्हणतात. निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई, आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही, हे अंगाईगीत गात आहेत. यावर ती चिमुकली म्हणते, नाही झोपला… मग वडील म्हणतात, नको झोपू दे…पण मला गाणं म्हणू दे, असं तिचे वडील म्हणतात. आणखी थोडी अंगाई गातात. मग पुन्हा ती म्हणते चंद्र नाही झोपला. मग तिचे वडील तिला हलकेच रागावतात आणि म्हणतात. नाही झोपला चंद्र? नको झोपू दे पण तू झोप…, वडील मुलीतील हा संवाद सोशल मीडियावर प्रचड व्हायरल आहे.
चंद्र झोपला नाही मग मीच का झोपू…? अंगाई म्हणू म्हणू कंटाळा आलाय, असं म्हणत हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हीडिओला आतापर्यंत 10 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. तसंच 5 लाख 20 हजार लोकांनी हा व्हीडिओ लाईक केलाय.सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.