
General Knowledge: ट्रेनचे रुळ तर सर्वांना माहिती असेल… मुंबईकरांच्या आयुष्यात लोकल आणि रुळ यांचं मोठं योगदान आहे. पण ट्रेनचा प्रवास करताना काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं फार महत्त्वाचं आहे… रेल्वे रुळांवरून चालणं अत्यंच धोकादायक आणि बेकायदेशीर आहे. लोक स्थानकांवरून रुळ ओलांडतात आणि ग्रामीण भागात, मुले आणि प्रौढ लोक फक्त मनोरंजनासाठी रुळांवरून चालतात. पण हे तुमच्या जीवावर बेतू शकतं.
जर एखादा व्यक्ती चुकून छत्री घेऊन रुळांवर चालायला लागला तर त्याचा मृत्यू निश्चित आहे. पण छत्री घेऊन पटरीवर चालल्यास काय होतं? असा प्रश्न तुम्हाला देखील नक्की पडला असेल… ही एक अशी वस्तुस्थिती आहे जी फार कमी लोकांना माहिती आहे. अलिकडेच एका माणसाने ते स्वतः दाखवून दिले आणि त्याचे कारण सांगितले.
इन्स्टाग्राम युजर जीतेंद्र बलोत याने नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे जो वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जीतेंद्र बलोत असा काही आश्चर्यकारक खुलासा करतो की तो सर्वांनाच थक्क करतो. जितेंद्र रेल्वे कर्मचारी आहे की नाही हे निश्चितपणे सांगता येत नाही.पण त्याने घातलेलं केशरी रंगाचं जॅकेट अनेकदा रेल्वे कर्मचारी घालतात, त्यामुळे अंदाज आहे की जितेंद्र हा रेल्वे कर्मचारी आहे. या व्हिडिओमध्ये तो छत्री घेऊन रेल्वे रुळांवर का चालू नका… असं सांगताना दिसत आहे.
एका व्हायरल व्हिडिओमध्ये जितेंद्रने रुळांवर छत्री घेऊन जाणं किती धोकादायक आहे हे थेट दाखवून दिल. तो छत्री घेऊन ट्रॅकवर चालताना दिसत आहे. त्यानंतर त्याला छत्रीच्या हँडलजवळ एक तीक्ष्ण आवाज ऐकू येतो, जो विद्युत प्रवाहाचा आवाज असतो. हा आवाज त्याच्या अंगठ्याच्या आणि छत्रीच्या हँडलमधून येत आहे.
खरं तर, जितेंद्रने स्पष्ट केलं की, तो 25 केव्हीच्या वीज तारेखाली छत्री घेऊन चालत होता. वीज छत्रीच्या वरच्या भागातून गेली आणि खालपर्यंत पोहोचली. वीज छत्रीच्या वरच्या टोकावरून खालच्या हँडवजवळ पोहोचते. अंगठा आणि छत्रीच्या हँडलमध्ये एक ठिणगी देखील दिसते. यामुळे तीव्र विजेचा झटका येऊ शकतो, म्हणून रुळावरून चालताना कधीच छत्रीचा वापर करु नये.