अफगाणिस्थानात नवा फतवा- चॅनेलवर महिला न्यूज अँकर्सना आता तोंड झाकून वाचाव्या लागणार बातम्या, सोशल मीडियात तालिबानवर जोरदार टीका

| Updated on: May 20, 2022 | 6:18 PM

काबूल – अफगाणिस्थानात तालिबान (Taliban)सत्तेत आल्यापासून महिलांचे अधिकार (Women rights)संकुचित करण्यात येत आहेत. त्यात आणखी एक पाऊल तालिबानने उचलले आहे. टीव्हीवरील न्यूज चॅनेलवर बातम्या वाचणाऱ्या महिला अंकर्सना (NEWS anchors)आता तोंड झाकून बातम्या वाचाव्या लागणार आहेत, अशा आशयाचे फर्मान तालिबानी अधिकार्यांनी काढले आहे. टोलो न्यूजकडून मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्थानातील सर्व न्यूज चॅनेल्सना हा फतवा जारी करण्यात आला […]

अफगाणिस्थानात नवा फतवा- चॅनेलवर महिला न्यूज अँकर्सना आता तोंड झाकून वाचाव्या लागणार बातम्या, सोशल मीडियात तालिबानवर जोरदार टीका
Talibani fatva for news anchors
Image Credit source: social media
Follow us on

काबूल – अफगाणिस्थानात तालिबान (Taliban)सत्तेत आल्यापासून महिलांचे अधिकार (Women rights)संकुचित करण्यात येत आहेत. त्यात आणखी एक पाऊल तालिबानने उचलले आहे. टीव्हीवरील न्यूज चॅनेलवर बातम्या वाचणाऱ्या महिला अंकर्सना (NEWS anchors)आता तोंड झाकून बातम्या वाचाव्या लागणार आहेत, अशा आशयाचे फर्मान तालिबानी अधिकार्यांनी काढले आहे. टोलो न्यूजकडून मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्थानातील सर्व न्यूज चॅनेल्सना हा फतवा जारी करण्यात आला आहे. तालिबान सातत्याने महिलांच्या अधिकारांवर गदा आणते आहे. मात्र हा आदेश म्हणजे कहर असल्याची टीका करण्यात येते आहे.

संतापाची लाट

या आदेशानंतर महलांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. एका महिला एँकरने सांगितले आहे की, महिलांनी मध्यमांत काम करु नये अशी तालिबान सरकारची इच्छा आहे. ते सुशिक्षित महिलांना घाबरतात. तर दुसऱ्या एका एँकरने सांगितले कीपहिल्यांदा तालिबानने महिलांच्या शिक्षणाचा अधिकार नाकारला. आता ते माध्यमांतही महिलांना पुढे जाताना पाहू शकत नाहीत.

सोशल मीडियावर तालिबानवर टीका

सोशल मीडियावर या नव्या फतव्यानंतर जोरदार टीका होते आहे. एका महिलेने ट्विट केले आहे कीसगळं जग कोरोना संक्रमाणापासून वाचण्यासाठी चेहऱ्यावर मास्क परिधान करत आहे आणि तालिबानी महिला त्यांची ओळख लपवण्यासाठी आपला चेहरा झाकून घेत आहेत. तालिबान्यांसाठी महिला हा एक आजार आहे. तर दुसऱ्या महिलेने ट्विट केले आहे की, अफगाणिस्थानात महिला २० वर्षे मागे चालल्या आहेत.

बुरखा परिधान करण्याचे फर्मान

अफगाणिस्थानात सत्तेत आल्यानंतर तालिबानने महिलांना जास्त अधिकार देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्याच्या उलट दर आठवड्याला महिलांची अडवणूक करणारी फतवे सरकारकडून जारी करण्यात येत आहेत. सत्तेत आल्यानंतर लगेचच, महिलांना सार्वजिनक ठिकाणी बुरखा परिधान करणे बंधनकारक करण्यात आले. लोकांमध्ये असताना बुरख्याविना त्यांनी राहू नये, असे फर्मान काढण्यात आले. सत्तेत येण्यापूर्वीही मुलींनी शाळेत जाऊ नये, अशीच तालिबानची भूमिका होती.

महिलांसाठी नॉटी वूमन असा उल्लेख

अफगाणिस्थानचे गृहमंत्री सीराजुद्दीन हक्कानी यांनी सीएनएएनला दिलेल्या एका मुलाखतीत, महिलांसाठी नॉटी वूमन असा उल्लेख केला. ज्यावेळी त्यांना अफगाणिस्थानात तालिबान्यांना घाबरुन महिला घराबाहेर पडत नाहीत, असा प्रश्न विचारला, त्यावेळी त्यांनी नॉटी वूमनना आम्ही घरात ठेवतो, असे उत्तर दिले. त्यानंतर यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी नॉटी वूमन म्हणजे अशा महिला ज्या दुसऱ्यांच्या सांगण्यावरुन सरकारला प्रश्न विचारतात, असे ते म्हणाले.