Viral होत असलेल्या ‘या’ फोटोमध्ये दडलंय मुलीचं नाव, उत्तर द्या आणि बघा किती जीनियस आहात?

सोशल मीडिया(Social Media)वर लोकांना कोडं (Puzzle) खेळ खूप आवडतं. लोक अशा खेळांमध्ये सक्रिय सहभाग घेतात, ज्यामुळे हे फोटो इंटरनेटवर येताच व्हायरल (Viral) होतात.

Viral होत असलेल्या या फोटोमध्ये दडलंय मुलीचं नाव, उत्तर द्या आणि बघा किती जीनियस आहात?
कोडे
| Updated on: Jan 18, 2022 | 7:00 AM

सोशल मीडिया(Social Media)वर लोकांना कोडं (Puzzle) खेळ खूप आवडतं. लोक अशा खेळांमध्ये सक्रिय सहभाग घेतात, ज्यामुळे हे फोटो इंटरनेटवर येताच व्हायरल (Viral) होतात. असं एक कोडं सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोकांना चित्र दाखवून मुलीचं नाव विचारण्यात आलं आहे. ट्विटर यूझरनं हे कोडं ट्विट केल्यापासून यूझर्सही यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांना असं कोडं सोडवणं आवडतं. काही जण विचार करतात. काही जणांना ते सोडवायला वेळ लागतो. तर काही जण चुटकीसरशी उत्तर देऊन मोकळे होतात.

डोकं चक्रावून जाईल

तुम्ही असा खेळ नक्कीच खेळला असाल, जिथं तुम्हाला चित्र दाखवून गोष्टींना नाव देण्यास सांगितलं जातं आणि या प्रक्रियेत एक गोष्ट निश्चित आहे, की ज्याला उत्तर आधीच माहीत आहे, अशा व्यक्तीकडून प्रश्न विचारला जातो. असाच काहीसा प्रकार समोर आलाय. हे पाहिल्यानंतर क्षणभर तुमचं डोकं नक्कीच चक्रावून जाईल.

नाव ओळखा

व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, की 100ची नोट दिसतेय आणि त्यासोबत एक टॅपदेखील दिसत आहे. सोशल मीडिया यूझर्सना या दोन वेगवेगळ्या गोष्टींचा फोटो दाखवून मुलीचं नाव विचारण्यात आलं आहे. तर हा फोटो पाहून त्यात कोणतं नाव दडलं आहे ते सांगता येईल का?

मजेशीर कमेंट्स

लोकांना या कोड्याचा खेळ खूप आवडलाय. यावर अनेक यूझर्सनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका यूझरनं लिहिलंय, ‘पक्के फुरसतिए हो गुरू.’ याशिवाय इतर अनेक यूझर्सना यावर मजेदार कमेंट्स केल्या आहेत. हा फोटो ट्विटर यूझर हकीम शेख यांनी शेअर केला आहे, ज्यासोबत त्यांनी कॅप्शन लिहिलंय, की मुलीचं नाव सांगा. या व्हिडिओला शेकडो लाइक्स आणि रिट्विट्स मिळालेत.

Video | कशाला हवी मोठी गाडी? मुंब्य्रातली पोरं म्हणतात, आमची अ‍ॅक्टिवाच भारी! आता घडणार जेलवारी?

कहानी सिनेमासारखाच थरारक प्रकार महिलेनं अनुभवला, माथेफिरूनं ट्रेनसमोर तिला ढकललं!

Video | मांजरींना कुशीत घेऊन झोपणाऱ्यांनो, हा वनरक्षक बघा! चक्क बिबटेच वनरक्षकाच्या कुशीत शिरले