AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | कशाला हवी मोठी गाडी? मुंब्य्रातली पोरं म्हणतात, आमची अ‍ॅक्टिवाच भारी! आता घडणार जेलवारी?

Mumbra Stunt Video : जीवघेणी स्टंटबाजी करणाऱ्या या मुलांनी ना हेल्मेट घातलं होता. रस्ते सुरक्षेचे सगळे नियम धाब्यावर बसवून या मुलांनी केलेली ही स्टंटबाजी आता चर्चेचा विषय ठरु लागली आहे.

Video | कशाला हवी मोठी गाडी? मुंब्य्रातली पोरं म्हणतात, आमची अ‍ॅक्टिवाच भारी! आता घडणार जेलवारी?
लहान मुलांची जीवघेणी स्टंटबाजी
| Edited By: | Updated on: Jan 17, 2022 | 6:27 PM
Share

ठाणे : मुंब्रा (Mumbra Stunt) स्टंटबाज लोकांचाच एरीया आहे की काय? असा प्रश्न कुणालाही पडावा. याला कारणही तसंच आहे. मुंब्य्रामध्ये टॅलेंटची कमी नाही. अर्थात टॅलेंट जिथे दाखवायला हवं तिथं ते दाखवलं जातंय का हाही प्रश्न आहेच. कारण मुंब्रातला एक व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे. हा व्हिडीओ साधासुधा नाही. एका स्कूटीवर कितीजण बसू शकतात? एक.. दोन… फारफार तर एखाद्या लहान मुलाला घेऊन तिघे बसू शकतील. तेही अगदीच गिचमिड करुन. पण मुंब्य्रातल्या पोरांनी कहर केला आहे. त्यांनी तीन, चार, पाच नव्हे तर तब्बल सहा जणांना स्कूटीवर नुसतं बसवलं नाही, तर मनमुराद फेरफटकाही मारुन दाखवला आहे. या व्हिडीओची सध्या मुंब्य्रात तुफान चर्चा आहे. अनेक व्हॉट्सअ‍ॅपग्रूपवर (WhatApp Groups) हा व्हिडीओ शेअर झाला असून या व्हिडीओमध्ये दिसणारी सर्व मुलं ही अल्पवयीन असण्याची शक्यता जास्त आहे. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठचा आहे, हे देखील आता उघड झालं आहे.

कुठचाय व्हिडीओ?

सहा मुलं अ‍ॅक्टिव्हावरुन जीवघेणा प्रवास करताना एका मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. रस्त्यावरुन जाणाऱ्याच एकानं हा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला आहे. इतकंच काय तर आणखी एकाला बसवता का?, असा उपरोधिक टोलाही या मुलांना लगावला आहे. चालकासह पाच जण सीटवर बसलेत. तर एखाला तर चक्क खांद्यावर बसवून जीवघेणी स्टंटबाजी या मुलांनी केली आहे. हा व्हिडीओ मुंब्य्रातील एमएम वॅली मित्तल रोडवरील असल्याची माहिती समोर आली आहे. या जीवघेण्या स्टंटबाजीला बघून आता या मुलांवर काय कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचंय.

हेल्मेट कुठेय?

जीवघेणी स्टंटबाजी करणाऱ्या या मुलांनी ना हेल्मेट घातलं होता. रस्ते सुरक्षेचे सगळे नियम धाब्यावर बसवून या मुलांनी केलेली ही स्टंटबाजी आता चर्चेचा विषय ठरु लागली आहे. या मुलांवर लवकरच कारवाई होण्याचीही शक्यता आहे. वाहतुकीचे सगळे नियम पायदळी तुडवून प्रवास करणाऱ्या या मुलांवर आता कोणती कारवाई होते, हे पाहणंही महत्त्वाचंय. विशेष म्हणजे ज्या एमएम वॅली मित्तल रोडवर ही स्टंटबाजी कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आली आहे, तिथं याआधीही अनेकदा दुचाकीस्वारांचे स्टंट बघितले गेले असल्याचंही बोललं जातंय. त्यामुळे या भागातील वाहतूक पोलिसांचं स्टंटबाज दुचाकीस्वारांना धाक उरलेला नाही की काय, असाही प्रश्न उपस्थित केला जातोय.

पाहा व्हिडीओ –

Video: बाईकवर स्टंट करायला गेला, आणि तोंड फोडून बसला, अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ समोर 

VIDEO : दुचाकीस्वाराचा गर्लफ्रेंडला पुढे बसवत रोमॅंटिक स्टंट, व्हिडीओ पाहून नेटकरी चकीत, म्हणतात हा तर वेडेपणा’

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.