गोंधळून टाकणारं चित्र! चित्रात दिसणारा चेहरा नेमका कुठल्या दिशेला? सांगा

अनेक वेळा आपल्या मेंदूला डोळे काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत हे समजत नाही. मेंदू आणि डोळे यांच्यात संवाद साधत नाही.

गोंधळून टाकणारं चित्र! चित्रात दिसणारा चेहरा नेमका कुठल्या दिशेला? सांगा
Optical illusion girl image
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 11, 2022 | 12:57 PM

प्रत्येकाला दोन चेहरे असतात. एक असा चेहरा जो आपण संपूर्ण जगाला दाखवतो. ऑप्टिकल भ्रम चे हे चित्र अतिशय चतुराईने रचलेले आहे. हे चित्र आपल्याला जगाशी संपर्क साधण्यास आणि मजबूत संबंध निर्माण करण्यास मदत करते. एक चेहरा जो आपल्याला दिसतो तो फक्त आपल्यालाच माहीत आहे, जो आपण जगापासून सर्वात जास्त काळ लपवून ठेवतो. दुसरा चेहरा जो स्वत:ची सावली घेऊन येतो. दुसरा चेहरा आपले सत्य, आपले दु:ख, आपल्या इच्छा आणि आपल्या प्रवृत्तींबद्दल बोलतो.

आपण सतत दोन चेहऱ्यांबद्दल का बोलतोय? कारण वरचं चित्र सुद्धा असंच आहे. यात तुमचं उत्तर काहीही असो, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. म्हणजेच दोन्ही बाजूंनी दिसणारा चेहरा बरोबर आहे.

हे चित्र तुमचं व्यक्तिमत्त्व दाखवतं. हे तुम्हाला फक्त गुंतवून ठेवतं. चित्रात मुलीचा ज्याही बाजूचा चेहरा तुम्हाला योग्य वाटतो तेच तुम्हाला उत्तर वाटतं.

पण दुसऱ्या बाजूचा चेहरा पाहिल्यावर तोही परफेक्ट वाटतो, याचं कारण म्हणजे ती ऑप्टिकल इल्युजन इमेज आहे. ऑप्टिकल भ्रम आपल्या मेंदूला फसवण्यासाठी असतात.

माणूस खूप हुशार आहे. माणसाचा मेंदू खूप चालतो. पण कधीकधी अशा परिस्थितीत तो गोंधळतो. अनेकदा आपला मेंदू आणि डोळे यांच्यात चुकीचा संवाद होतो.

अनेक वेळा आपल्या मेंदूला डोळे काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत हे समजत नाही. मेंदू आणि डोळे यांच्यात संवाद साधत नाही. म्हणून हा गोंधळ उडतो.

उदा., आपण जर टेबलावर एखादे सफरचंद ठेवले असेल, तर ते सफरचंद पिकले आहे की नाही, सफरचंद आपल्यापासून किती दूर आहे आणि ते किती मोठे किंवा लहान आहे हे आपला मेंदू आपल्याला सांगू शकतो. कारण तेव्हा तो आपल्या डोळ्यांचं ऐकतो. त्यांची चांगली सांगड असते.

पण अनेकदा आपले डोळे गोंधळतात, कधीकधी मेंदू गोंधळतो आणि मग यालाच ऑप्टिकल भ्रम म्हणतात. यात डोळे आणि मेंदूची सांगड बसत नाही. त्यांच्यात नीट संवाद होत नाही.