AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Optical Illusion | या दोन चित्रातील फरक सांगा

या चित्रात एक प्लेट आहे ज्यात पॅनकेक, अंडी, बेरीज, ब्लॅक कॉफी, संत्री असं सगळं ठेवलंय. या दोन्ही प्लेट मध्ये याच गोष्टी आहेत अगदी हुबेहूब... पण या दोन्हीमध्ये फरक आहे. हाच फरक तुम्हाला 15 सेकंदात शोधून दाखवायचा आहे.

Optical Illusion | या दोन चित्रातील फरक सांगा
spot the difference
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jul 06, 2023 | 10:41 AM
Share

मुंबई: लहानपणी आपण कोडी सोडवायचो. ही कोडी सोडवायला आपल्याला खूप मजा यायची. सुट्टीला आजोळी गेलं की एक ठरलेला कार्यक्रम असायचा, सगळी भावंडं गोळा झाली की कोड्यांची चढाओढ लागायची. एक जण कोडी सांगणार दुसरा ती सोडवणार. जो ते कोडं पटकन सोडवून दाखवेल तो सगळ्यात हुशार ठरायचा. जसजसा काळ पुढे सरकला कोड्यांचं स्वरूप बदललं. आता हीच कोडी ऑनलाइन आलीत. या कोड्यांना आता ऑप्टिकल इल्युजन म्हणतात. ऑप्टिकल इल्युजन हा एक प्रकारचा मेंदूचा व्यायाम आहे. ही कोडी इंटरनेट वर इतकी फेमस आहेत की लोकं रिकाम्या वेळेत ही कोडी सोडवत बसतात.

ऑप्टिकल इल्युजन मध्ये वेगवेगळे प्रकार असतात. अशा चित्रांमध्ये काय लपलंय हे शोधायचं असतं, कधी यात एखादा चुकीचा शब्द शोधायचा असतो तर कधी यात आपल्याला सर्वात आधी काय दिसतंय हे सांगायचं असतं. हे ऑनलाइन कोडे सोडवताना खूप कस लागतो. निरीक्षण कौशल्य चांगली असणारी व्यक्ती अशा प्रकारची कोडी सहज सोडवू शकते. आता हेच चित्र नीट पहा…या चित्रातला फरक तुम्हाला सांगायचा आहे. इथे एक ब्रेकफास्टची प्लेट ठेवली आहे. यात काय फरक आहे हे तुम्हाला सांगायचं आहे.

15 सेकंदात तुम्हाला या दोन चित्रांमधील फरक सांगायचा आहे. या चित्रात एक प्लेट आहे ज्यात पॅनकेक, अंडी, बेरीज, ब्लॅक कॉफी, संत्री असं सगळं ठेवलंय. या दोन्ही प्लेट मध्ये याच गोष्टी आहेत अगदी हुबेहूब… पण या दोन्हीमध्ये फरक आहे. हाच फरक तुम्हाला 15 सेकंदात शोधून दाखवायचा आहे.

चित्रातील फरक

  • ऑम्लेट च्या साइज मध्ये फरक आहे. एका चित्रात ऑम्लेट ब्रेडच्या बाहेर आलंय आणि दुसऱ्या चित्रात ते अगदी व्यवस्थित आहे.
  • चित्र नीट निरखून बघा. कप आणि पॅनकेक मध्ये ठेवलेल्या चेरी बघा एका चित्रात तिथे पाने आहेत, दुसऱ्या चित्रात ती पाने तिथे नाहीत.
  • संत्राच्या फोडी जवळ पुढच्या बाजूला पहा. एका चित्रात २ स्ट्रॉबेरी आणि मध्ये एक द्राक्ष आहे. दुसऱ्या चित्रात तिन्ही स्ट्रॉबेरी आहेत.

आम्ही हे फरक चित्रात गोल करून दाखवत आहोत. तुम्हाला याचं उत्तर मिळालं असेल तर उत्तम. नसेल मिळालं तर खालील चित्र एकदा नजरेखालून घाला.

Here is the difference

Follow Us
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..