AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोट खाजवत असणारे मंत्री महोदय व्हायरल! व्हिडीओ पाहून पाकिस्तानी अभिनेत्री म्हणते, ‘माणूस बना, माकड नाही!’

Pakistani Actress Mathira: हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानी कलाकर असलेल्या एका अभिनेत्रीनंही जामिल यांना सुनावलंय. त्यांच्वर टीका करताना पाकिस्तानी अभिनेत्री मथिरानं सोशल मीडियावरुन मंत्री महोदयांचा समाचार घेतलाय.

पोट खाजवत असणारे मंत्री महोदय व्हायरल! व्हिडीओ पाहून पाकिस्तानी अभिनेत्री म्हणते, 'माणूस बना, माकड नाही!'
पाकिस्तानी अभिनेत्री घेतली मंत्री महोदयांची फिरकीImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Apr 19, 2022 | 9:39 PM
Share

काहींना पोट (Stomach) ही श्रीमंती वाटते. खात्या पित्या खराचं लक्षण म्हणूनही पोटाकडे पाहिलं जातं. पण सुटलेलं पोट असणाऱ्यांना त्याचे चांगलेच दुष्परिणाम ठाऊक असतात. पोट आणि त्यातही सुटलेलं पोट हे चांगलं की वाईट, हा वेगळा विषय. त्या सुटलेलं पोट (Belly) कुणी चारचौघात खाजवताना दिसलं, तर? शर्ट, सदरा वर करुन ही खाज मिटवणाऱ्यासाठी एकानं पोट खाजवलं तर किती विचित्र दिसेल ना? पण खाज अनावर झालेल्या एका मंत्री महोदयांनी खरंच असं केलंय. शर्ट वर करुन मनसोक्त पोट खाजवणं हे कॅमेऱ्यानं (Viral video recorded on Mobile) पाहिलं. कॅमेऱ्यात कैद झालेली ही घटना सोशल मीडियापासून लांब थोडीच राहणार होती? व्हिडीओ एका कोणत्यातरी प्लॅटफॉर्मवर आला. बघता बघता प्रचंड व्हायरल झाला.

पोट खाजवणारा पाकिस्तानी मंत्री!

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ आहे एका पाकिस्तानी मंत्र्याचा. आज तकनं दिलेल्या वृत्तानुसार हा व्हिडीओ आहे जामिल चौधरी यांचा. पाकिस्तानच्या राष्ट्रीय संसदेत त्यांनी पोट खाजवलं. ज्या प्रकारे ते पोट खाजवताना कॅमेऱ्यात कैद झाले, ते फारच विचित्र होतं. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून जामिल चौधरी यांच्यावर निशाणा साधलाय. अनेकांनी त्यांना ट्रोल केलंय.

पाकिस्तानी अभिनेत्रीनं सुनावलं..

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानी कलाकर असलेल्या एका अभिनेत्रीनंही जामिल यांना सुनावलंय. त्यांच्वर टीका करताना पाकिस्तानी अभिनेत्री मथिरानं सोशल मीडियावरुन मंत्री महोदयांचा समाचार घेतलाय. खाज येणं स्वाभाविक आहे. पण खाज मिटवायची कशी हे प्लीज सांगू नका. माणूस बना, माकड नव्हे…, असं म्हणत या अभिनेत्री मंत्री जामिल यांची फिरकी घेतली आहे.

पाहा व्हिडीओ :

पाकिस्तानी अभिनेत्रीनं जामिल यांना सुनावताना जराही कसर सोडली नाही. खाज आली तर समजू शकतो. पण राष्ट्रीय संसदेसारख्या सुपर प्रोफेशन ठिकाणी ममंत्री साहेबांनी केलेलं हे कृत्य पाहून मथिरालाही संताप आला. हा व्हिडीओ पाहून, देवानं यांना माफ करावं, असं म्हणत मथिरानं फिरकी घेतली आहे. सार्वजनिक ठिकाणी विचित्रपणे खाजवण्याचं धाडस करणारा हा माणूस नाही जनावरासारखा आहे, असंही मथिरानं म्हटलंय. दरम्यान, हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नेमकं काय वाटतंय, ते कमेंटमध्ये सांगायला विसरु नका…

इतर ट्रेन्डिंग बातम्या :

नात सासरी निघाली, आजी भावूक झाली, पाहा व्हीडिओ…

हुमा कुरेशीच्या तोडीस तोड जैनिलची ‘शिकायत’, व्हीडिओ पाहून तुम्हीही चाहते व्हाल…

“ये दोस्ती हम नहीं तोडेंगे…”, अपंग मित्राला घेऊन निघाल्या दोघी मैत्रिणी, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव…

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.