एवढी खराब आहे Imran Khan यांची उर्दू? Memes share करत सोशल मीडियावर उडवली जातेय खिल्ली

Imran Khan spoof video : बिलावल भुट्टो यांनी इम्रान खानच्या उर्दू बोलण्याच्या कौशल्यावर खोचकपणे एक मीम स्वरुपातला स्पूफ व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये इम्रान खान उर्दू बोलताना अनेकवेळा अडकताना दिसत आहे.

एवढी खराब आहे Imran Khan यांची उर्दू? Memes share करत सोशल मीडियावर उडवली जातेय खिल्ली
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान
Image Credit source: Twitter
| Updated on: Mar 14, 2022 | 6:24 PM

Imran Khan spoof video : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान जेव्हा जेव्हा काही करतात तेव्हा ते कोणत्या ना कोणत्या कारणाने स्वतःची खिल्ली उडवतात, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. आता बघा ना, साहेबांनी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सह-अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांचा मुलगा बिलावल भुट्टो (Bilawal Bhutto Zardari) यांनी त्यांना उर्दू (Urdu) शिकवण्याची विनंती केली आहे. पण आता त्यांच्याच उर्दूने त्यांना अक्षरश: बुडवले आहे. बिलावल भुट्टो यांनी इम्रान खानच्या उर्दू बोलण्याच्या कौशल्यावर खोचकपणे एक मीम स्वरुपातला स्पूफ व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये इम्रान खान उर्दू बोलताना अनेकवेळा अडकताना दिसत आहे. आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानी त्यांच्या ‘वजीर-ए-आला’ची मजा घेऊ लागले आहेत.

‘मला उर्दू शिकवायला निघाले होते’

शेजारील देशाचे इम्रान साहेब काही मानायलाच तयार नाहीत. मध्यतरी पाकिस्तानात खचाखच भरलेल्या सभेत ते मोठ्या तोऱ्यात म्हणाले होते, की असिफ अली झरदारी, तुम्ही तुमच्या मुलाला उर्दू शिकवा. पण काही दिवसांनंतर आपलीच फजिती होईल, याची त्यांना कल्पना नव्हती. बिलावल भुट्टो यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून इम्रान खानचा एक स्पूफ व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबतच कॅप्शनमध्ये लिहिले आहे, की पीएम मला उर्दू शिकवायला निघाले होते. 2 मिनिट 18 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये इमरान खान उर्दू बोलताना अनेक वेळा अडकताना दिसत आहेत.

लोक उडवत आहेत खिल्ली

सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडिओ आता व्हायरल झालाय. त्यांच्या खराब उर्दूसाठी इम्रान खान यांची लोक खिल्ली उडवत आहे. एका यूझरने कमेंट करताना लिहिले, की ज्यांची घरे काचेची आहेत, ते इतरांच्या घरांवर दगडफेक करत नाहीत. तर काही लोक हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बिलावल भुट्टो यांनाही काही सांगत आहेत. राजकीय पक्षाचा प्रमुख असल्याने असे मीम शेअर करणे अनाकलनीय आहे, असे काहींचे म्हणणे आहे, तर कुणी पक्ष चालवण्याऐवजी स्वत:चे मीम पेज सुरू करा, असा सल्ला देत आहे.

आणखी वाचा :

Viral : ‘मला खरं प्रेम मिळालं’ म्हणत कोट्यवधीचा मालक करणार 30 वर्ष लहान मुलीशी लग्न!

#Himveers : कबड्डी… कबड्डी… कडाक्याच्या थंडीत ITBP जवानांचा रंगला खेळ, Video viral

Arabic Kuthuचा परदेशातही धुराळा; ‘हा’ Super dance पाहून यूझर्स म्हणतायत, भावा, तू बॉलिवूडच्या प्रेमात पडलायस!