Viral News: आधी खाल्ल, मग टेबलवर चढला! सूपमध्येच केली लघवी, कोर्टाने ठोठावला अडीच कोटींचा दंड, वाचा नेमकं काय घडलं?

Viral News: एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सूपमध्ये लघवी केल्यामुळे कोर्टाने मुलांच्या पालकांना जवळपास 2.71 कोटी रुपयांचा दंड ठेठावला आहे. आता नेमकं प्रकरण काय आहे चला जाणून घेऊया...

Viral News: आधी खाल्ल, मग टेबलवर चढला! सूपमध्येच केली लघवी, कोर्टाने ठोठावला अडीच कोटींचा दंड, वाचा नेमकं काय घडलं?
Soup
Image Credit source: silentblossom Twitter
| Updated on: Sep 18, 2025 | 1:10 PM

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका कोर्टाने पालकांवर २.७१ कोटी रुपये दंड ठोठावला आहे. खरंतर, या दांपत्याच्या दोन नशेत धुंद असलेल्या किशोरवयीन मुलांनी रेस्टॉरंटमध्ये जाऊन सूपमध्ये लघवी केली होती. यासंदर्भात कोर्टाने पालकांना चांगलाच दंड ठोठावला आहे. तसेच पालक मुलांना योग्य ते संस्कार देण्यात अपयशी ठरल्याचे देखील सांगितले आहे. आता ही घटना कुठे घडली? नेमकं काय घडलं? चला जाणून घेऊया…

नेमकं काय घडलं?

ही घटना शांघायमध्ये घडली आहे. तेथील हॅडिलाओ हॉटपॉट रेस्टॉरंट हे प्रसिद्ध आहे. या रेस्टॉरंटमध्ये एक दांपत्य त्यांच्या 17 वर्षांच्या मुलांना घेऊन गेले होते. ही घटना 24 फेब्रुवारी 2025 रोजी घडली. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दोन्ही किशोरवयीन मुलांनी रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघरामध्ये जाऊन धुमाकूळ घातले. दोघेही टेबलवर चढले, मांस आणि भाज्या शिजवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सूपमध्ये त्यांनी मुद्दाम लघवी केली. त्यानंतर रेस्टॉरंटने या कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केली.

Viral Video : एक हरीण 10 शिकारी, अटीतटीची लढाई… शेवटी जंगलाचा राजा आला अन्…थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल

सूपमध्ये किशोरांनी केली लघवी

कोर्टाने कोणत्याही पुराव्याशिवाय ८ मार्चपर्यंत या रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या ४ हजारांहून अधिक ग्राहकांना नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. यामध्ये ग्राहकांना पूर्ण परतावा तसेच त्यांच्या बिलाच्या १० पट नुकसान भरपाई मिळेल, तसेच, लघवीमुळे खराब झालेल्या भांड्यांची स्वच्छता आणि नवीन भांडी खरेदी करण्यासाठी झालेल्या खर्चाचीही वसुली करण्यात आली आहे. हॅडिलाओने सुरुवातीला या घटनेमुळे प्रभावित झालेल्या ग्राहकांना दिलेल्या नुकसान भरपाईचा हवाला देत २३ दशलक्ष युआनपेक्षा जास्त नुकसान भरपाई मागितली होती.

कोर्टाने ठोठावला भारी दंड

एका वृत्तवाहिनीच्या मते, कोर्टाने असेही म्हटले आहे की, पालक आपल्या मुलांना चांगले संस्कार आणि संगोपन देण्यात अपयशी ठरले आहेत. कोर्टाने रेस्टॉरंटच्या प्रतिष्ठेला झालेल्या नुकसानीसाठी २० लाख युआन, टेबलवेअरच्या नुकसानीसाठी आणि स्वच्छतेसाठी १.३० लाख युआन आणि कायदेशीर खर्चासाठी ७०,००० युआन देण्याचे आदेश दिले आहेत. म्हणजेच, एकूण २.७१ कोटी रुपये नुकसान भरपाई या दांपत्याला भरावी लागेल. कोर्टाने हेही स्पष्ट केले की, रेस्टॉरंटने स्वेच्छेने ग्राहकांना बिलापेक्षा जास्त पैसे दिले आहेत, ते या दांपत्याकडून वसूल केले जाणार नाहीत. कोर्टाने या दांपत्याला आणि त्यांच्या मुलांना वृत्तपत्रात माफी मागण्याचा आदेशही दिला आहे.